Home नांदेड कै .मधूकररावजी पाटील खतगावकर यांच्या स्मरणार्थ आयोजित क्रिकेटसामन्यांचे बक्षीस वितरण सम्पन्न…

कै .मधूकररावजी पाटील खतगावकर यांच्या स्मरणार्थ आयोजित क्रिकेटसामन्यांचे बक्षीस वितरण सम्पन्न…

84
0

राजेंद्र पाटील राऊत

कै .मधूकररावजी पाटील खतगावकर यांच्या स्मरणार्थ आयोजित क्रिकेटसामन्यांचे बक्षीस वितरण सम्पन्न…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्युज नेटवर्क)
-शंकरनगर- येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूल चे उपाध्यक्ष कै .मधूकररावजी पाटील खतगावकर यांच्या स्मरणार्थ मधूकरदादा प्रीमियर लीग क्रिकेट च्या सामन्यांचे आयोजन प्राचार्य डी. पी.पांडेय यांनी केले होते.बक्षीस वितरण सोहळ्याचे उदघाटन श्री .बाळासाहेब पाटील खतगावकर, प्राचार्य डी.पी.पांडेय ,रेड्डी सर, प्राध्यापक बालाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले . विशेष म्हणजे हे सामने जवळपास एक महिने चालले जवळपास आठ संघानी सहभाग नोंदवला होता अंतीम सामना सुपर क्लब गोदावरी मनार चा संघ व कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यांच्यात झाला सुपर क्लब ने नानेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व आठ षटकामध्ये 57 धावांचे लक्ष ठेवले हे लक्ष त्यांना झेपावले नाही सुपर क्लब ने वीस धावांनी जिंकत चषक आपल्या नावांनी केला. प्रथम पारितोषिक 10501 श्री प्राचार्य डी.पी.पांडेय व प्राचार्य शेळके धनंजय यांच्या तर्फे ,द्वितीय 5501 बिरादार गँस एजन्सी देगलूर, तर तृतीय पारितोषिक लॉयन क्लब यांना 3501 तिरुपती किराणा शंकरनगर , चतुर्थ पारितोषिक नवयुवक मित्रमंडळ पँराडाईझ शूज नरसी 2501, तर सामनावीर अंकमवार ओम 1001 ,मालिकावीर असिफ शेख 1001 शंकर पवार यांच्या तर्फे, सर्वात जास्त षटकार असिफ शेख 1001 हणमंतराव पा.तोडे, सर्वात जास्त धावा अभिजीत कांबळे 1001, सर्वात जास्त बळी रुपेश चव्हाण डोंनगावकर टेंट यांच्या तर्फे देण्यात आले पारितोषिके वरील मान्यवरांच्या वतीने देण्यात आले प्रसंगी संघाचे सर्वच खेळाडू व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

Previous articleखासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्केच कर्मचारी उपस्थिती
Next articleमौजे बाराहाळी व मुक्रामाबाद परिसरातील शेतकऱ्यांनी वीज जोडणी पूर्ववत करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here