Home नांदेड भंडारा प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मयत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...

भंडारा प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मयत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १०लाखाची मदत द्यावें – सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

169
0

राजेंद्र पाटील राऊत

भंडारा प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मयत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १०लाखाची मदत द्यावें – सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नांदेड, दि. ११ – राजेश एन भांगे

भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आज दहा बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे वेळीच काळजी घेतली असती तर आज ही दुर्दैवी घटना घडली नसती भंडारा जिल्ह्यातील अख्या महाराष्ट्रातील सुन्न करणारी घटना आहे,आगीची घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ८ मुली आणि २ मुलं अशी दहा बालकं दगावली. निष्पाप बालकं गेली. ही बालकं बाहेर जन्मली होती, मात्र जन्मत: कमी वजन आणि ऑक्सिजनचा कमी पुरवठा अशी ही बालकं होती, त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरु होते. रात्री शॉर्ट सर्किटने स्पार्क झाला आणि अचानक स्फोट झाला. काळ्या धुरामुळे काहीही दिसत नव्हतं. हा धूर बालकांच्या वॉर्डमध्येही घुसला. सात बालकांना वाचवण्यात यश
आलं सगळे गाढ झोपेत असताना काळानं डाव साधला.ज्या घरांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट होणार होता. त्या कुटुंबाचं सुख काळाला पाहवलं गेलं नाही आणि त्याला सुस्थावलेल्या सरकारी व्यवस्थेचीही मदत झाली. शॉर्ट सर्किटचं निमित्त ठरलं आणि डोळे उघडून छाती भरून मोकळा श्वास घेण्याआधीच दहा कोवळ्या जिवांनी जगाचा निरोप घेतला. भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या या घटनेनंतर मातांच्या आक्रोशानं अंधार हेलावून गेला. आपल्या चिमुकल्यांसाठी टाहो फोडणार्‍या मातांना बघून सगळ्यांचे डोळे भरून आले.शनिवारची सकाळ महाराष्ट्राला ह्रदयाला पाझर फोडणारी बातमी घेऊन आली. भंडारातील जिल्हा रुग्णालयात झोपेच्या डुलक्या घेणार्‍या कोवळ्या जिवांना काळानं कवेत घेतलं. अतिदक्षता शिशु केअर युनिटमध्ये १७ चिमुकल्यांपैकी दहा जणांना काळानं हिरावून घेतलं. सात चिमुकल्यांचा श्वास न घेता आल्यानं गुदमरुन मृत्यू झाला. तर तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. कोमळ हळव्या शरीराचे झालेले ऐकून चिमुकल्यांच्या मातांचं अवसानच गळालं. क्षणभर काहीच कळालं नाही. लेकरू कायमच गेलं, हे ध्यानात येताच रुग्णालयाला हेलावून टाकणारा आक्रोश मातांच्या मुखातून बाहेर पडला. चिल्यापिल्यांसाठीचा हा आक्रोश ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले नाही. तर रुग्णालयाच्या भिंतीही शहारल्या. प्रशासन सात मुलांना वाचवल्याचं सांगत असलं, तरी दहा कुटुंब मात्र शोकात बुडाली आहे.जिल्हा रुग्णालयाकडून शॉर्ट सर्किटचं निमित्त सांगितलं जात आहे. शासनाने त्वरित बालकांच्या पालकांना प्रत्येकी दहा लाख रुपये येवढी मदत देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून पीडित परिवारांना न्याय द्यावा आशी मागणी – शिवानंद पांचाळ नायगांवकर सामाजिक कार्यकर्ता नांदेड यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, इवल्याशा पावलांनी घरात येऊ पाहणारं सुख सरकारी अनास्थेनं हिरावून घेतलं, ते या पैशातून मिळणार आहे का? असा सवाल दुःखाच्या सागरात बुडालेली ही कुटुंब करत आहेत.

Previous articleजाहूर ता मुखेड येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा संपन्न..
Next articleबर्ड फ्ल्यूबाबत प्रशासन सतर्क, दिशभुल अथवा अफवा पसरविल्यास तात्काळ कारवाई करु – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here