Home नाशिक इतिहास अभ्यासक संजय बिरार यांना मल्हार रत्न पुरस्कार प्रदान

इतिहास अभ्यासक संजय बिरार यांना मल्हार रत्न पुरस्कार प्रदान

43
0

आशाताई बच्छाव

1000287776.jpg

इतिहास अभ्यासक संजय बिरार यांना मल्हार रत्न पुरस्कार प्रदान

दैनिक युवा मराठा
चांदवड प्रतिनिधी – लक्ष्मण आवारे

ऐतिहासिक चांदवड नगरीत श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रंगमहालाच्या साक्षीने होळकर घराण्याचे १६ वे वंशज महाराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री अमर दादा होळकर यांच्या हस्ते ‘मल्हार रत्न पुरस्कार’ संजय बिरार लासलगाव यांना देण्यात आला. पुरस्कारांबरोबर होळकर घराण्याशी शान असलेली घोंगडी त्यांना भेट म्हणून मिळाली.
‘आपण कार्य करत असतांना, त्याची दाखल घेऊन आणि पाठीवर कौतुकाची थाप मारून, बळकट हात जेव्हा आपले कौतुक करतात तेव्हा आणखीन उर्जा मिळते, स्फूर्ती मिळते काम करायला!’ असे प्रतिपादन त्यांनी भावणा व्यक्त करतांना केले.
यावेळी महाराजा मल्हारराव होळकर जन्मोत्सव समितीचे सर्व सदस्य, सरदार घराण्यांचे वंशज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here