Home नाशिक नाशिकच्या आय.सी.आय.फायनान्स मध्ये धाडसी दरोडा सुमारे पाच कोटी लंपास

नाशिकच्या आय.सी.आय.फायनान्स मध्ये धाडसी दरोडा सुमारे पाच कोटी लंपास

189

आशाताई बच्छाव

1000348071.jpg

राज्य प्रतिनिधी श्री संजय वाघमारे, दिलीप चव्हाण:-     आय सी आय सी च्या होम फायनान्स मध्ये मोठी घर फोडी, सविस्तर वृत्त खालील प्रमाणे नाशिक शहरामध्ये आयसीआयसीआय बँक होम फायनान्समध्ये मोठी घरफोडी झालेली आहे. जवळपास 222 खातेधारकांची या बँक मध्ये असणाऱ्या बँक लॉकर ची मोठ्या प्रमाणात घरफोडी झालेली आहे. या घरफोडी मध्ये जवळपास 222 ग्राहकांचे ठेवलेले पाच कोटी रुपयांचे दागिने लांपास केलेले आहेत. त्या चोरट्यांनी एवढी मोठी घरफोडी केली कशी हा खूप मोठा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे ग्राहकांसमोर बघायला आहे. अशा खाजगी संस्थावर देखील असे कार्य होत असेल तर या ठिकाणी ग्राहकांनी स्वतःला सुरक्षित कसे मानावे त्यामुळे हा प्रश्न फार गंभीर असून या प्रश्नांचं त्वरित निकाल निघावा अशी ग्राहकांची इच्छा आहे. या चोरीची तक्रार सरकार वाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सरकार वाडा पोलीस स्टेशन ने त्याठिकाणी जाऊन सविस्तर पाहणी करून या चोरांना लवकरात लवकर पकडण्यात येईल असे आश्वासन त्यांना दिलेले आहे. या मोठ्या चोरीमुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले असून या चोरांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये सुद्धा काही झालेले आहेत त्यामुळे पुढचा तपास करायला नक्कीच सहकार्य होईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सविस्तर तपास करून लवकरात लवकर या चोरांना पकडण्यात येईल अशी त्यांनी ग्वाही दिली.