Home नाशिक टाकळी (विंचूर) विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

टाकळी (विंचूर) विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

144

आशाताई बच्छाव

1000287785.jpg

टाकळी (विंचूर) विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल टाकळी विंचूर तालुका निफाड येथील विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक लभडे एस डी सर तसेच पालक प्रकाश रामभाऊ मोकाटे व सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक श्री जाधव आर डब्लू सर व अश्पाकभाई शेख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक लभडे एस डी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर विचार व्यक्त करतांना सांगितले की, डाॅ बाबासाहेब आंबेडकर प्रसिद्ध भारतीय कायदेतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते. त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि प्रजासत्ताक संस्थापकांपैकी एक म्हणून ओळखले जातात‌. त्याचबरोबर लोकशाही म्हणून भारताचे भविष्य घडविण्यात आणि सुनिश्चित करण्यात ही त्यांचे योगदान अतुलनीय मानले जाते. नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वताच्या ताकदीवर विश्वास ठेवा हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले. याप्रसंगी विद्यालयाचे उपशिक्षक कनोज एन व्ही, आहिरे जे डी‌, मुदगुल एस एस, कदम एन आर, खैरनार एस एस व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देवून कार्यक्रम संपला.

Previous articleइतिहास अभ्यासक संजय बिरार यांना मल्हार रत्न पुरस्कार प्रदान
Next articleश्रीक्षेत्र कातरणी येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठा श्री श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.