Home नाशिक श्रीक्षेत्र कातरणी येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठा श्री श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी...

श्रीक्षेत्र कातरणी येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठा श्री श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते

43
0

आशाताई बच्छाव

1000287790.jpg

श्रीक्षेत्र कातरणी येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठा श्री श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

श्रीक्षेत्र कातरणी तालुका येवला येथे श्रीराम लक्ष्मण सीता व हनुमान यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आज सकाळी १० वाजता श्री श्री १००८ स्वामी शिवगिरी जी महाराज त्र्यंबकेश्वर यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने त्रिदिनी कीर्तन महोत्सव आयोजित केलेला होता ,त्यामध्ये शनिवारी १३ /४ /२०२४रोजी वाणीभूषण ह भ प तुकाराम महाराज वाजे वागदर्डी ,तसेच दिनांक१४/४/२०२४ रविवारी रात्री ही भ प धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते खडक माळेगावकर यांचे किर्तन झाले, आज सोमवार दिनांक १५/४/२०२४ रोजी सकाळी १०वा धर्माचार्य निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकर यांचे काल्याचे किर्तन होईल. नंतर श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी जी महाराज त्रंबकेश्वर यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रमानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल, त्या निमित्ताने कातरणी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून भव्य असे रामाचे मंदिर साकारले, व सर्व मंदिरांची साफसफाई केली, विद्युत रोषणाई करून ,फुल सजावट केली , राम ,लक्ष्मण ,सीता व हनुमान यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठेच्या पूजा करिता अकरा जोडपे बसलेले आहे, नाशिक येथील ५ ब्रह्मरुंद सुनील कुलकर्णी गुरुजी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा पूजा चालू आहे, त्यानिमित्त दररोज सायंकाळी ६ ते ७ वाजता हरिपाठ, दररोज रात्री ९ते ११वाजेपर्यंत हरी किर्तन असते, ह भ प कारभारी भाऊ चिगटगावकर, ह भ प नवनाथ महाराज नागरे जालना, ह भ प स्वप्निल कुलकर्णी गुरुजी, दाणे गुरुजी, यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Previous articleटाकळी (विंचूर) विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी
Next articleनांदुर्डी विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन—
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here