Home नाशिक बारदान गोदामाला लागलेल्या आगीमुळे नाशिकरोड परिसरात ९ दुकानांना झळ

बारदान गोदामाला लागलेल्या आगीमुळे नाशिकरोड परिसरात ९ दुकानांना झळ

160

आशाताई बच्छाव

1000350347.jpg

नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
बारदान गोदामाला लागलेल्या आगीमुळे नाशिकरोड परिसरात ९ दुकानांना झळ बसली. सुभाष रोडवर असलेल्या लाकडी आणि बारदानच्या गोदामला सकाळी १० च्या सुमारास ही आग लागली. त्यानंतर आग विझवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले. काही वेळातच अग्निशमन दलाचे १६ बंब दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अचानक ही आग कशी लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही. या आगीमुळे लाखोचे दुकानदारांचे नुकसान झाले आहे.

बाळासाहेब ठाकरे रुग्णालय बिटको हॉस्पिटल जवळ जुने कोर्टाच्या मागील बाजूस, आनंद कोम्पलेक्स समोर, सोमनाथ बाबा चाळ येथील अन्वर उमर खान, सुकडू उमर खान बारदान वाले यांच्या बारदानच्या गोदामाला ही आग लागली. सकाळी दहा वाजेच्या सुमारास या अगीचे नाशिकरोड मधील विविध भागातुन धुराचे लोट बाहेर येताना दिसत होते. नागरिकांनी तातडीने अग्निशमक दलाला कळवले.

Previous articleआदर्श विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
Next articleकै.ना. अ. देशमुख महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ –
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.