Home अमरावती कै.ना. अ. देशमुख महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ –

कै.ना. अ. देशमुख महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ –

52
0

आशाताई बच्छाव

1000350354.jpg

कै.ना. अ. देशमुख महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ –
मयुर खापरे चांदुर बाजार
चां. बाजार स्थानिक
कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय चांदुर बाजार येथे दि- 22/04/2024 रोजी  पदवी वितरण समारंभ पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या पुजनाने महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. वनिता चोरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या गृहअर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. नीना चवरे, भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. जयश्री पडोळे, बी. सी. ए. विभाग प्रमुख प्रा. यावर जाफर, ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. डॉ. मिना वैद्य, तसेच महाविद्यालयाचे मुख्य लिपीक श्री. अनिल भाकरे उपस्थित होते.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2023 मधील विद्यार्थ्यांना  40 साव्या पदवी वितरण समारंभाच्या अनुषंगाने पदवींचे वितरण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील एम. ए.भूगोल ची विद्यार्थीनी कु. समिक्षा कोरडे ही विद्यापीठातून प्रथम येण्याचा बहुमान मिळाला. याबरोबरच एम.ए. भूगोल  विभागातून एकूण 14 विद्यार्थी, बी.ए. विभागातून एकुण 38 तर बी. सी.ए. विभागातून 09 विद्यार्थ्यांना पद‌वीचे वितरण करण्यात आले.
यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता चोरे यांनी  सर्व पदविप्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना उज्वल भविष्याकरीता शुभेच्छा दिल्या.आपण आपल्या भावी आयुष्यात उच्चतम शिखर गाठावे, आपल्या शैक्षणिक प्रगती बरोबरच महाविद्यालयाचे नाव सुद्धा मोठ करावे अशी आशा व्यक्त केली. महाविद्यालयाची व संस्थेची ही उज्वल यशाची, परंपरा अशीच वाढावी अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. विपुल चुके यांनी केले. कार्यक्रमामध्ये योगेश वैद्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता विद्यापीठ गीताने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here