🛑 सुशांत राजपूत ची एवढ्या कोटीची, एका सिनेमाची कमाई🛑
✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ उत्तम अभिनयाच्या जोरावर टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत स्वत:ची छाप पाडणारा अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. नेहमी आनंदी राहणाऱ्या सुशांतच्या सहकारी कलाकारांव्यतिरिक्त, सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला. त्याच्या मृत्यूच्या वृत्तावर सुरुवातीला कोणीच विश्वास ठेवला नाही. त्याच्या आत्महत्येची माहिती त्याच्या नोकराने पोलिसांना दिली. ज्याने आजवर आपल्या कारकीर्दीत एवढे चित्रपट करून ही यश मिळाले नाही तेवढे यश कमी चित्रपटांतून सुशांतला मिळाले. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारीत चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती.
सुशांतसिंह राजपूत हा एक चांगला अभिनेताच नाही तर एक उत्तम डान्सर आणि टीव्ही होस्ट देखील होता. एका चित्रपटासाठी तो 5 ते 7 कोटी रुपये मानधन घेत होता. त्याचवेळी जाहिरातीसाठी 1 कोटी रुपयाचे मानधन घेत होता. त्याने अनेक रियल इस्टेट प्रॉपर्टीमध्येही गुंतवणूक केली. त्याची एकूण मालमत्ता 80 लाख डॉलर्स म्हणजेच 60 कोटी रुपयापेक्षा अधिक आहे. त्याच्या एमएस धोनी चित्रपटाने तब्बल 220 कोटी रुपयांची कमाई केली होती. सुशांतसिंग याने चित्रपट, जाहिरात आणि गुंतवणूकीद्वारे कोट्यावधी रुपये कमावले.⭕

anews Banner

Leave A Comment