Home Breaking News मॅग्नेटिक महाराष्ट्र’ पर्व दुसरे : गुंतवणुकीसाठी आज १२ करार

मॅग्नेटिक महाराष्ट्र’ पर्व दुसरे : गुंतवणुकीसाठी आज १२ करार

151
0

🛑 मॅग्नेटिक महाराष्ट्र’ पर्व दुसरे : गुंतवणुकीसाठी आज १२ करार 🛑
✍️मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई : ⭕करोनामुळे उद्योग-व्यवसायाला आलेली मरगळ आणि रोजगार-उत्पादन, करसंकलनाला उतरती कळा लागल्याच्या पाश्र्वभूमीवर अर्थचक्राला गती देण्यासाठी महाराष्ट्राने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. उद्योग-सेवा क्षेत्रात नवी उभारी घेण्यासाठी राज्यात सोमवारी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’चे दुसरे पर्व सुरू होत आहे.

अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूरसह देशातील मोठय़ा उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची तयारी के ली असून, त्यासाठी १२ सामंजस्य करारांवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत.
करोनामुळे चीनमधून बाहेर पडून इतर देशांत कारखाने सुरू करण्याचा अनेक देशांच्या कं पन्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने परदेशी कं पन्यांशी चर्चा करण्यासाठी विशेष समिती नेमली. या समितीच्या वाटाघाटींना यश आले असून, अमेरिका, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील मोठय़ा उद्योगांनी अभियांत्रिकी, वाहन व वाहन घटक, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक, रासायनिक, अन्न प्रकिया या क्षेत्रांत गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्राला पसंती दिली आहे.

जागतिक स्तरावरील नामांकित उद्योजक, प्रमुख देशांचे राजदूत व देशातील द्विपक्षीय गुंतवणूक संस्था यांच्यासमवेत सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दूरचित्रसंवादाच्या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात १२ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होईल. उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, थेट परदेशी गुंतवणुकीसाठी समन्वयक म्हणून प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यावेळी उपस्थित राहतील.
करोनामुळे लाखो मजूर-कामगार आपापल्या राज्यात निघून गेले असून, पुन्हा उद्योग सुरू करण्याचे आव्हान उभे ठाकले होते. मात्र, टाळेबंदीच्या र्निबधात शिथिलता आणल्यानंतर राज्यात एकूण ६० हजार उद्योग सुरू झाले असून, त्यात १५ लाख कामगार कामावर रूजू झाले आहेत, असे पी. अनबलगन यांनी सांगितले.

आता या सामंजस्य करारांमुळे ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या दुसऱ्या पर्वाची सुरूवात होईल. त्यात ४० हजार एकराहून अधिक क्षेत्रफळाच्या जमिनीची उपलब्धता, लवचिक भाडय़ाने जमीन घेण्याची मुभा, ४८ तासांत स्वयंचलित परवानग्या, विशेष कामगार संरक्षण मार्गदर्शन व स्थानिक कौशल्य यासाठी कामगार ब्युरोसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

या कार्यक्रमात विविध देशांचे राजदूत-वाणिज्यदूत सहभागी होतील. यासह वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज आणि यूएस-इंडिया पार्टनरशिप फोरमसह द्विपक्षीय भागीदारी करारावर स्वाक्षरी होणार आहे.⭕

Previous articleराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे जोगेश्वरी विधानसभा विभागात मोफत मास्क वाटप
Next article
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here