• Home
  • सुशांत सिंग राजपूतने संपवली आयुष्याची ‘इनिंग’!

सुशांत सिंग राजपूतने संपवली आयुष्याची ‘इनिंग’!

🛑 सुशांत सिंग राजपूतने संपवली आयुष्याची ‘इनिंग’! 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 14 जून : ⭕ २०२० हे साल अचानक आलेल्या आपत्तींसाठी कायम लक्षात राहणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजवला असताना बॉलीवूडनेही कधीही न भरून निघणाऱ्या जखमा खाल्ल्या आहेत. यापूर्वीच सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार ऋषी कपूर, इमराफ खान यांच्या निधनामुळे सदम्यात असलेल्या बॉलीवूडला आता यंग, डॅशिंग चॉकलेट बॉय अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या अचानक घेतलेल्या एक्झिटचे दुःख सोसावे लागत आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही बातमी समजताच बॉलीवूडसह त्याच्या चाहत्यांनीही दुःख व्यक्त केले आहे. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी सुशांतने आपले जीवन संपवणे, हे काही मनाला पटत, अशी भावना सोशल मीडियातून त्याच्या आत्महत्येवर येत आहे.

आतापर्यंत बॉलीवूडला छोट्या पडद्यातील अनेक कलाकार लाभले आहेत. त्यापैकीच एक सुशांत सिंग राजपूत होता. बिहारच्या पाटणामध्ये २१ जानेवारी १९८६ साली सुशांतचा जन्म झाला. त्याचे वडील सरकारी अधिकारी असून त्यांचे कुटुंब २००० च्या सुरुवातीला दिल्लीला स्थायिक झाले होते. त्याचे सुरुवातीचे शिक्षण सेंट कॅरेंस हायस्कूल पाटणामध्ये झाले. नंतर दिल्लीच्या कुलाची हंसराज माॅडल स्कूलमध्ये त्याने पुढील शिक्षण पूर्ण केले. दिल्लीच्या काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्याने मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. २००८ साली किस देस मे है मेरा दिल या छोट्या पडद्यावरील मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती एकता कपूर यांच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून. या मालिकेतील त्याची सहकलाकार अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्यासोबतची त्याची जोडी प्रेक्षकांना खुपच भावली. दोन वर्ष सुरू असलेल्या या मालिकेमुळे दोघांमध्ये प्रेमसंबंधही जुळून आले. कितीवर्ष सुशांत आणि अंकिता रिलेशनशिपमध्ये होते. काही काळानंतर हे नाते संपुष्टात आहे. सुशांत हा उत्तम अभिनेता तर होताच पण तो चांगला डान्सरही होता. त्याने जरा नच के दिखा आणि झलक दिख ला जा सिजन ४ मध्ये नृत्य कौशल्य दाखवले होते. पुढे याचा फायदा त्याला बॉलीवूडमध्येही झाला.

डेली सोपमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या सुशांतला आता मोठा पडदा खुणावत होता. टीव्ही ते सिल्व्हर स्क्रिनपर्यंत पोहोचायला सुशांतला पाच वर्ष लागली. २०१३ साली काय पो छे या चित्रपटातून सुशांत सिंग राजपूतने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अमित साद आणि राजकुमार राव हे त्याचे सहकलाकार होते. मात्र पहिल्याच चित्रपटात सुशांत प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. चित्रपटात सुशांत एक क्रिकेट कोच दाखवला असून बॉलीवूडमधील त्याची यशस्वी इनिंगच जणू त्याने सुरू केली होती. पुढे वेगवेगळे चित्रपट करून त्याने ही इनिंग सुरू ठेवली. सुशांतच्या अभिनयाची खरी ओळख पटली ती भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांच्या जीवनावर आधारिक एम. एस. धोनी या चित्रपटातून. कॅप्टन कूलची व्यक्तिरेखा साकारताना सुशांतने पडद्यावर खराखुरा धोनीच उभा केला. प्रेक्षकांनी रिअलसोबर रिल धोनीलाही पसंती दर्शवली. आणि सुशांतच्या बॉलीवूड इनिंगमध्ये सक्सेसचा टर्निंग पॉईंट आला. त्याशिवाय सुशांतने केदारनाथ, राबता, पीके, सोनचिरीया, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी, शुद्ध देसी रोमान्स, ड्राईव्हसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. छिछोरे हा त्याचा प्रदर्शित झालेला अखेरचा चित्रपट ठरला. तर दिल बेचारा हा सुशांतचा आगामी चित्रपट होता. बॉलीवूडमध्ये अवघ्या दहा चित्रपटांमधून यशस्वी कारकिर्द सुरू करणाऱ्या सुशांतने आत्महत्या का केली. हे कोड अद्याप तरी उलगडलेलं नाही. मात्र सुशांतने अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे बॉलीवूडने एक हरहुन्नरी कलाकार गमावला एवढं मात्र खरं आहे.⭕

anews Banner

Leave A Comment