🛑 अभिनेता सुशांत सिंग राजपुतने केली आत्महत्या, राहत्या घरात लावला गळफास 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई, 14 जून : ⭕ बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड विश्वातील अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली असून सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. ही घटना समजताच या घटनेच्या तपासासाठी या अभिनेत्याच्या घरी मुंबई पोलिस दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना या घटनेबद्दल फोन करून याबाबत माहिती दिली असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.⭕
