*दहिवडला पुन्हा बिबटयाचा धुमाकूळ आज रविवारी परत एक गो-हा ठार*
दहिवड,(राहुल मोरे युवा मराठा न्युज)-देवळा तालुक्यातल्या दहिवड परिसरातील खडकी मळा भागात आज रविवारी पुन्हा बिबटयाने आपली दहशत कायम ठेवत एका गो-ह्यावर हल्ला चढवत गो-हा जागीच ठार केला.
दोन दिवसापुर्वीची घटना ताजी असतानाच आज रविवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा बिबटयाने शेतकरी काशिनाथ कृष्णा पवार यांच्या खडकी मळा येथील गट नंबर ८५९ मध्ये गो-ह्यावर हल्ला चढवित गो-हा ठार केला.सदरची घटना हि दोन दिवसापुर्वी घडलेल्या घटनास्थळापासून अवघ्या ७००/८०० मिटर अंतरावर असल्याने त्यामुळे जंगलात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.देवळा वनविभागाने या परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबटयाचा बंदोबस्त करावा व गोधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वनविभागाने तातडीने पाऊल उचलावीत अशी मागणी दहिवड ग्रामपंचायत व प्रहार संघटनेचे देवळा तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर यांनी वनविभागाकडे केली आहे.
