• Home
  • जनावरांचा बाजार भरविल्यास* *कोरोना व्हायरसला आमंत्रणच.*

जनावरांचा बाजार भरविल्यास* *कोरोना व्हायरसला आमंत्रणच.*

*जनावरांचा बाजार भरविल्यास* *कोरोना व्हायरसला आमंत्रणच.*

*मोहन शिंदे युवा मराठा न्यूज ब्यूरोचिफ कोल्हापूर*

हातकणंगले तालुक्यात पेठ वडगांव शहरामध्ये आठवड्याचा बाजार प्रसिद्ध आहे.
दर सोमवारी हा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो आणि जनावरांचा बाजार देखिल मोठ्या प्रमाणात भरतो.
जवळपास वडगांवच्या अवतीभवतीच्या ३६ खेड्यातील लोक बाजारात येत असतात.
पेठ वडगांवच्या बाजारा दिवसाची लाखोची उलाढाल होत असते.
जनावरांच्या खरेदी विक्री साठी सांगली , कोल्हापूर, जिल्ह्यातून व कर्नाटकातून व्यापारी मोठ्या प्रमाणात येत असतात.
पण सद्ध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर जनावरांचा बाजार पुर्णपणे बंद आहे.
काही प्रतिष्ठित लोकांनी व सामाजिक संघटनानी जनावरांचा बाजार चालू करनेची मागणी केली आहे. सद्ध्या कोरोना पार्श्वभूमीवर जनावरांचा
बाजार परत चालू करणे म्हणजे कोरोनाला घरी बोलावने असे होईल.
कारण बाजार हा मोठ्या प्रमाणात असतो आणि लोकांची गर्दी ही खुप असते. आणि सोशल डिस्टींगचा बोजवारा उडणार आहे.
वडगांव शहरांमधील मनसे च्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला आहे.
आणि शहरांतील नागरिकांचा ही विरोध आहे.

anews Banner

Leave A Comment