Home गुन्हेगारी कोयता गँगचा फरार आरोपीसह दोघे पिस्टलसह चाळीसगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात..

कोयता गँगचा फरार आरोपीसह दोघे पिस्टलसह चाळीसगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात..

113
0

Yuva maratha news

IMG-20240225-WA0190.jpg

कोयता गँगचा फरार आरोपीसह दोघे पिस्टलसह चाळीसगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात…

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील– रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना
श्रीकृष्ण नगर करगांव रोड, चाळीसगांव येथे एका राहत्या घरात हत्यारे बाळगत असल्याची माहिती मिळाल्यावर
चाळीसगाव शहर पोलीसंनी पिस्टल व जिवंत काडतूस चॉपर सह दोघा पिता पुत्राला अटक केल्यावर पुणे येथील कोयता गँग च्या आरोपीकडून हत्यारे विकत घेतल्याची माहिती त्यांनी दिल्यावर चाळीसगाव शहरातून पुणे येथे दाखल गुन्ह्यातील आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधिकक्ष अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखली पोलीस निरीक्षक संदिप पाटील, उपनि योगेश माळी, पोना दिपक पाटील, पोकॉ. अमोल भोसले, पोकॉ विनोद खैरनार, योगेश बेलदार, विनोद भोई, नितीश पाटील पोना निलेश पाटील नंदकिशेर महाजन ,मनोज चव्हाण, मपोहेकॉ विमल सानप हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करीत असताना त्यांना माहिती मिळाल्यावरून ऋषिकेश ऊर्फ मायकल व त्याचे वडील दिपक भटु पाटील रा. श्रीकृष्ण नगर करगांव रोड, चाळीसगांव यांच्या घरात हत्यारे असल्याची माहिती मिळाल्यावर दि 24 रोजी झाडती घेतल्यावर घरात एक गावठी पिस्टल एक जिवंत काडतुस व चॉपर मिळुन आले आहे
सदर हत्यारे त्यांनी निखील जगन्नथ शिंदे उर्फ बंडी निक्या रा लक्ष्मीनगर, येरवडा पुणे व त्याच्या मित्राकडुन २१५००/- रुपयास विकत घेतल्याची माहिती दिली व तो आरोपी चाळीसगाव शहरात वास्तव्यास राहत असल्याची माहिती दिल्यावर पोलिसांनी त्यास अटक केली असून निखील जगन्नथ शिंदे उर्फ बंडी सराईत गुन्हेगार असुन तो येरवाडा पुणे येथील कोयता गँगचा सदस्य आहे.
कोयता गँग मधील सदस्यांनी दिनांक २५/१२/२०२३ रोजी रात्रीच्या सुमारास लक्ष्मीनगर येरवडा पुणे भागात हातात कोयते, तलवारी व दगड घेवुन सुमारे ३०ते३५ वाहनांच्या काचा फोडुन परिसरात दहशत निर्माण केली होती याबाबत येरवडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून गुन्हा घडल्यापासुन निखील शिंदे उर्फ बंडी निक्या हा फरार होता.
वरील 3 आरोपी विरुध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला गुरनं ८१/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ४/२५ २९ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ककलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आलेला आहे तरी आरोपी अटक करुन पुढील तपास PSIयोगेश माळी व पोलीस
कल्पेश पगारे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here