Home गुन्हेगारी मालेगाव शहर व तालुक्यात बनावट ताडीमाडीची जोरदार विक्री….! उत्पादन शुल्कच्या अधिका-यांना नारळपाणी...

मालेगाव शहर व तालुक्यात बनावट ताडीमाडीची जोरदार विक्री….! उत्पादन शुल्कच्या अधिका-यांना नारळपाणी तर ताडी पिणा-यांना भेसळमिश्रीत ताडी..!!

117
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240204_151111.jpg

मालेगाव शहर व तालुक्यात बनावट ताडीमाडीची जोरदार विक्री….!
उत्पादन शुल्कच्या अधिका-यांना नारळपाणी तर ताडी पिणा-यांना भेसळमिश्रीत ताडी..!!
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव – नाशिकच्या मालेगाव शहर व तालुक्यात सध्या बनावट व भेसळमिश्रीत ताडी विक्री माफीयाने थैमान घातले असून या आरोग्याशी व घातक प्रकाराशी खेळणाऱ्या भेसळमिश्रीत ताडी विक्री करणाऱ्या माफियांच्या गैरकृत्याकडे मात्र राज्य उत्पादन शुल्कच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने ताडी पिणा-या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणा-या ताडी माफियांला मात्र प्रशासनच पाठीशी घालीत असल्याचे एकंदरीत चित्र उभे राहिले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मालेगाव शहरातल्या मोसमपुल नदीपात्रा लगत बी.श्रीनिवास मलैय्या नामक ताडी माफीयाने आपला अड्डा सुरू केलेला असून,या अड्ड्यावर दररोज हजारो ग्राहक ताडी प्राशन करण्यासाठी हजेरी लावत असतात मात्र या अड्ड्यावर कुठलाही काळ वेळ निश्चित ठरलेला नसल्याने रात्री उशिरापर्यंत हा अड्डा सुरूच असतो त्यामुळे या परिसरात अनेकदा वादविवादाचे प्रकार घडल्याचेही बोलले जाते.तर सगळ्यात गंभीर बाब म्हणजे काही नियम व अटी शर्तीना अधीन राहून सुरू करण्यात आलेल्या या ताडी अड्ड्यावर नैसर्गिकरीत्या निर्माण होणारी ताडी मिळणे कठीण झालेले आहे.नैसर्गिक ताडी विक्रीच्या नावाखाली भेसळमिश्रीत ताडी जास्तीची नशा यावी व ग्राहक आकर्षित करण्यासाठी ताडीत चुना आणि मड्रक्स व अटवीन या झोपेच्या गोळयांचे मिश्रण करून भेसळयुक्त ताडीची सर्रासपणे विक्री केली जात आहे.त्यामुळे ताडी पिणा-या ग्राहकांना या भेसळमिश्रीत ताडी पिण्यामुळे चक्कर येणे,अंग दुखणे,मळमळ होणे,डोके दुखणे,पोट फुगल्यासारखे होणे अशा स्वरूपाच्या घातक व गंभीर आजाराची लक्षणे दिसून येत असतानाही प्रशासन कोणत्या दृष्टीने या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे हे अद्याप तरी मालेगाव वासियांना न सुटलेले कोडेच म्हणावे लागेल.
उद्या वाचा! रावळगाव.ताडीमाफीयाची तालुक्यातील खेडोपाडी बोगसगिरी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here