Home मुंबई ब्रेकिंग न्यूज…. महाराष्ट्रातील रेशन दुकानदार भयानक चिंतेत! अंत्योदय धारकांना वाटप कराव्या लागणार...

ब्रेकिंग न्यूज…. महाराष्ट्रातील रेशन दुकानदार भयानक चिंतेत! अंत्योदय धारकांना वाटप कराव्या लागणार एकाच रंगाच्या साड्या…

283
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240204_103212.jpg

ब्रेकिंग न्यूज….
महाराष्ट्रातील रेशन दुकानदार भयानक चिंतेत!
अंत्योदय धारकांना वाटप कराव्या लागणार एकाच रंगाच्या साड्या…
(राजेंद्र पाटील राऊत)
मुंबई – राज्य सरकारने आता एक अजब गजब निर्णय घेतला असून, त्यामुळे महाराष्ट्रातील सगळेच रेशन दुकानदार भयंकर चिंतेत सापडल्याचे चित्र दिसत आहे.
महाराष्ट्रातील रेशन दुकानदारांकडे अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना साड्या वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून, त्यासाठी साड्यांचा माल देखील उपलब्ध झाला आहे.महाराष्ट्रातील एकूण २४ लाख ८० हजार ३८० साडयाचा नग देखील उपलब्ध झाला आहे.शासनासाठी लाडाची मायबहिण ठरलेल्या अंत्योदय योजनेतील लाभार्थी महिलांना या साडयांचे सोमवारपासून वाटपाला सुरुवात होणार आहे.पण या साड्यांच्या रंगावरून वाद निर्माण होतील अशी भिती असल्याने त्यामुळेच महाराष्ट्रभरातील रेशन दुकानदार भयंकर चिंतेत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.तर दुस-या बाजूला काही ठिकाणी अजूनही आनंदाचा शिधा उपलब्ध झालेला नसल्यामुळे अगोदरच वेगवेगळी उतरे देऊन त्रस्त झालेल्या रेशन दुकानदारांना या साडी वाटप योजनेची मोठीच डोकेदुखी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here