Home पुणे मनाचा मोठेपणा ..! घरकाम करणाऱ्या मुलीच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी थेट मावळमध्ये पोहचला...

मनाचा मोठेपणा ..! घरकाम करणाऱ्या मुलीच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी थेट मावळमध्ये पोहचला जॅकी श्रॉफ 🛑

176
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 मनाचा मोठेपणा ..! घरकाम करणाऱ्या मुलीच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी थेट मावळमध्ये पोहचला जॅकी श्रॉफ 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मावळ /पुणे :⭕बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असणारे जॅकी श्रॉफ हे त्यांच्या साधेपणासाठे ओळखले जातात. त्यांच्या याच साधेपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. आपल्याकडे घरकाम करणाऱ्या तरुणीच्या आजीचं निधन झाल्याची बातमी समजल्यानंतर जॅकी थेट या मुलीच्या घरी म्हणजेच पुणे जिल्ह्यातील मावळमधील पवनानगर येथे पोहचले. श्रॉफ यांच्याकडे काम करणारी दीपाली तुपे या तरुणीच्या आजीचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. वयाची शंभरी ओलांडलेल्या तान्हाबाई ठाकर यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर आज सकाळी जॅकी स्वत: दिपालीच्या आजीच्या घरी गेले आणि त्यांनी कुटुंबाचं सांत्वन केलं.

श्रॉफ हे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीवर मात करून यश मिळवलेले अभिनेते म्हणून ओळखले जातात. सुरुवातीचे आयुष्य चाळीत काढल्याने जॅकी यांची सर्वसामान्यांशी नाळ जोडल्याचे अनेकदा दिसून येते. श्रॉफ यांचा मावळ येथील चांदखेड येथे बंगला असून मुंबईमधून ते अनेकदा या ठिकाणी आराम करण्यासाठी येत असतात. अशाच एका भेटीदरम्यान श्रॉफ यांच्याकडे काम करणाऱ्या दीपालीच्या आजीचे शंभराव्या वर्षी नुकतच निधन झाल्याची माहिती त्यांना मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने दिपलीच्या आजीचे घर गाठत ठाकर कुटुंबाचे सांत्वन करत धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. जॅकी यांनी घरातील सर्व सदस्यांशी चर्चा करत त्यांची विचारपूस केली. जॅकी यांच्यासारखा मोठा अभिनेता आजीच्या निधनानंतर सांत्वन करण्यासाठी थेट आपल्या घरी आल्याचे पाहून ठाकर कुटुंब भारावून गेलं. जॅकी यांनी अगदी सर्वसामान्यांप्रमाणे जमीनीवर बसून घरातील वरिष्ठांचीही चौकशी करत त्यांना धीर दिला.

जॅकी श्रॉफ यांनी यापूर्वीही अनेकदा अशाप्रकारे आपल्या साध्या वागणुकीमधून चाहत्यांची मन जिंकली आहेत.

जॅकी यांना पाहून कुटुंबीय भारावून गेले. ⭕

Previous articleकचऱ्यातील PPE कीट हाताने उचलतात पालिका कर्मचारी; त्यांना हातमोजे देऊ, अधिकाऱ्यांची वैचारिक दिवाळखोरी 🛑
Next articleविद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मिळणार, मंत्री नवाब मलिक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here