• Home
  • विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मिळणार, मंत्री नवाब मलिक

विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मिळणार, मंत्री नवाब मलिक

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210317-WA0015.jpg

विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मिळणार,
मंत्री नवाब मलिक

मुंबई: ( युवा मराठा न्युज नेटवर्क)-शासकीय आणि खाजगी आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना २८ हजार ८०० रुपये प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मिळणार आहे.
कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर प्रवेश घेणाऱ्या आणि खाजगी आयटीआयमधून शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्तीचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाडीबीटी वेबसाईटवर जाऊन अर्ज करावेत, अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेतून लाभ घेण्यासाठी १० मार्चपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे . विद्यार्थ्यांनी महाडीबीटीच्या https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत, असं आवाहन मंत्री नवाब मलिक यांनी केलेयं. प्रतिपूर्ती योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना होणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

anews Banner

Leave A Comment