• Home
  • नामपूरला दहा हजाराची लाच घेताना सहायक्क पोलीस निरीक्षक महाजन गजाआड

नामपूरला दहा हजाराची लाच घेताना सहायक्क पोलीस निरीक्षक महाजन गजाआड

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220329-WA0083.jpg

नामपूर,(काकासाहेब सांळुखे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                                               नामपूर दूरक्षेत्र येथील कार्यरत असलेल्या सपोउनि जगन्नाथ महाजन दहा हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांनी रंगेहात पकडले आहे गुन्ह्यातील नाव काढण्यासाठी तक्रारदार कडे चाळीस हजाराची लाचेची मागणी केली होती तडजोडी अंती दहा हजाराची लाच स्वीकारताना पकडले नामपुर दूरक्षेत्र येथे चार वाजता अटक करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी जगन्नाथ महाजन याने तक्रार दाराकडून दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी चाळीस हजार सहाशे रुपये रक्कम ची मागणी केली होती तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती दिनांक 26 दुपारी चार वाजता नामपुर दूरक्षेत्र येथे सापळा रचून दहा हजाराची लाच स्वीकारताना महाजन यास अटक करण्यात आली त्यानंतर लाचलुचपत विभागाने महाजन यास ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक परिक्षेत्र सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान वाघ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार पोलीस हवलदार उत्तम महाजन विजय ठाकरे पोलीस नाईक देवराम गावित मनोहर आहिरे यांनी सापळा यशस्वी केला

anews Banner

Leave A Comment