Home नाशिक देवळ्यात भरदिवसा घरफोडी; चोराने रोख रक्कम व सोने केले लंपास

देवळ्यात भरदिवसा घरफोडी; चोराने रोख रक्कम व सोने केले लंपास

163

आशाताई बच्छाव

1000561600.jpg

देवळ्यात भरदिवसा घरफोडी; चोराने रोख रक्कम व सोने केले लंपास

सतीश सावंत-विभागीय प्रतिनिधी : क. स. मा. दे.

येथील ज्ञानेश्वर नगर (वाखारी रोड) परिसरात गुरुवारी (दि. १८) रोजी भरदिवसा सकाळी ९ वाजेच्या सुमारास धाडशी घरफोडी झाली असून, यात सुमारे दीड लाख रुपये रोख व १५ तोळे सोने असा सुमारे १२ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. अज्ञात चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नाशिकहुन फिंगर प्रिंट व डॉग पथकाला पाचारण करण्यात आले होते. देवळा पोलिसांनी घटनस्थळी भेट देऊन पंचनामा करून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं..?

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, देवळा येथील ज्ञानेश्वर नगर (वाखारी रोड) परिसरात राहणारे आदेश बोअर वेलचे संचालक आदेश ठाकरे हे आज गुरुवारी (दि. १८) रोजी सकाळी ७ वाजता सहकुटूंब नाशिकला गेले होते. अज्ञात चोरट्याने घर बंद असल्याचा फायदा घेऊन सकाळी ९ वाजेच्या सुमारास घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात व बेडमध्ये ठेवलेले रोख दीड लाख रुपये व १५ तोळेसोने असा सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल लंबविला. चोरट्याने घरातील सामान अस्ताव्यस्त केले आहे. ठाकरे यांना आपल्या घरात चोरी झाल्याचा प्रकार आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी सांगितल्यावर ते नाशिकहुन तात्काळ घरी पोहचले. या घटनेची खबर त्यांनी देवळा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

भर वस्तीत व दिवसा हि धाडशी घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. देवळा तालुक्यात गेल्या काही महिन्यांत अनेक चोरीच्या घटना घडल्या असून, या प्रकरणांचा छडा लावण्याचे आव्हान देवळा पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. पोलिसांनी याची कसून चौकशी करून या चोरट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी देवळा शहर व उपनगरातील नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Previous articleशहरात अश्लील चाळ्यांसाठी चालणाऱ्या कॅफेवर पोलिसांनी टाकली धाड
Next articleदेवळा तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण; बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.