• Home
  • मा.खा.राहुलजी शेवाळे यांच्याशी शिवसेना सह संपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य श्री,अरविंद कात्रटवार यांनी केली विविध विषयावर चर्चा

मा.खा.राहुलजी शेवाळे यांच्याशी शिवसेना सह संपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य श्री,अरविंद कात्रटवार यांनी केली विविध विषयावर चर्चा

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220329-WA0042.jpg

मा.खा.राहुलजी शेवाळे यांच्याशी शिवसेना सह संपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य श्री,अरविंद कात्रटवार यांनी केली विविध विषयावर चर्चा

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
शिवसेनेचे खासदार मा,श्री,राहुलजी शेवाळे साहेब हे नुकतेच शिवसंपर्क अभियानाच्या निमित्याने गडचिरोली जिल्हयाच्या दौऱ्यावर आले होते.यादरम्यान शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य श्री,अरविंदभाऊ कात्रटवार यांनी त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. यावेळी मा.खा.शेवाळे साहेब यांनी कात्रटवार यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली.शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.उध्दवजी ठाकरे साहेब व जिल्हयाचे पालकमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनात जिल्हयात शिवसेना वाढीसाठी जोमाने काम सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायतीच्या निवडणूकीत शिवसेनेला यश प्राप्त झाले.शिवसेनेचे सपंर्क प्रमुख किशोर पोतदार यांच्या नेतृत्वात जिल्हयातील गावागावात शिवसेनेची पताका फडकविण्यात येत असून कार्यकर्ते पक्षाशी जुळत आहे.त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपरिषदांच्या निवडणूकीत सुध्दा शिवसेनेला मोठे यश प्राप्त होईल,असेही अरविंदभाऊ कात्रटवार यांनी मा.खा. राहुलजी शेवाळे साहेब यांच्याशी चर्चेदरम्यान स्पष्ट केले.पालकमंत्री मा,एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासारखे विकासपुरूष पालकमंत्री जिल्हयाला मिळाल्याने जिल्हयाच्या विकासाला गती मिळाली आहे.अनेक प्रलंबीत कामे मार्गी लागली आहेत.जिल्हयाच्या विकासासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे.रस्ते, वीज,पाणी,आरोग्य विषयक सोयीसुविधा यासह अनेक समस्या मार्गी लागल्या असून गडचिरोलीचे चित्र पुर्वीच्या तुलनेत पालटले आहे. जिल्हयाच्या विकासात आता आमुलाग्र बदल होत असल्याची महत्ती शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी मा.खा.राहुलजी शेवाळे साहेब यांच्याशी चर्चेदरम्यान विषद केली

anews Banner

Leave A Comment