Home गडचिरोली ४ एप्रिल ला होणाऱ्या महा जनआक्रोश मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा आमदार...

४ एप्रिल ला होणाऱ्या महा जनआक्रोश मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे आवाहन

121
0

राजेंद्र पाटील राऊत

४ एप्रिल ला होणाऱ्या महा जनआक्रोश मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे आवाहन
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
भारतीय जनता पार्टी गडचिरोली तालुका व शहर पदाधिकाऱ्यांची फंक्शन हॉल गडचिरोली येथे नियोजन बैठक

ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात व सुधीरभाऊ मुनगंटीवार व चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात होणार महा जनआक्रोश मोर्चा व जाहीर सभाराज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात होणाऱ्या ४ एप्रिल २०२२ च्या महा जन आक्रोश मोर्चा व जाहीर सभेला गडचिरोली तालुका व शहरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा या महा जनआक्रोश मोर्चाचे मुख्य संयोजक डॉ. देवरावजी होळी यांनी गडचिरोली तालुका व शहराच्या वतीने आयोजित मोर्चाच्या नियोजनाच्या बैठकीत केले.

यावेळी मंचावर जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, ज्येष्ठ भाजपा नेते रमेशजी भुरसे, गडचिरोली शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,मोर्चाचे तालुका संयोजक विलासजी भांडेकर, नगर परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. योगिताताई पिपरे, महिला आघाडीच्या नेत्या रेखाताई डोळस, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रंजीताताई कोडापे, तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, न प चे माजी उपाध्यक्ष अनिलभाऊ कुनघाडकर, गडचिरोली महिला आघाडीच्या शहराध्यक्षा कविताताई उरकुडे, तालुका महामंत्री राजूभाऊ खंगार , लोमेश कोलते,युवा मोर्चाचे सागरभाऊ कुभंरे, पंचायत समिती सदस्य शंकरजी नैताम, महामंत्री विनोद देवोजवार, प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून राज्यात सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. शेतकऱ्यांच्या धानाला बोनस नाही. शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची वीज कापली जात आहे, २४ तास विजेची आवश्यकता असताना केवळ ८ तास नाममात्र वीज देऊन वारंवार खंडित केली जात आहे, राज्यात गुंडशाही ,दडपशाही महिलांवर अत्याचार सुरू आहेत. मात्र त्याकडे शासन गंभीर नाही. राज्यातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यातील काही मंत्री जेलमध्ये आहेत आणि मंत्र्यांवर देश दहशतवाद्यांना पैसे दिल्याचेही गंभीर आरोप आहेत परंतु त्यांना शासन निर्लज्जपणे समर्थन करीत आहे .या सर्व प्रकारामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. जनतेच्या मनातील हा महा जनआक्रोश असून या मोर्चाच्या निमित्ताने सरकारच्या कानापर्यंत जनतेचा आवाज पोहोचविणे आवश्‍यक आहे .त्यामुळे या मोर्चाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकार प्रति आक्रोश व्यक्त करावा .त्याकरिता आपल्या गावातील महिला ,मजूर, कामगार, शेतकरी, तरुण ,या सर्वांना या मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करावे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here