• Home
  • नायगाव तालुक्यातील बरबड्याच्या जिल्हा परिषद शाळेत केंद्रप्रमुख श्री रेडेवाड सरांच्या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत सोनूचा बाबा तुम्ही मेळाव्याला चला गणूचा काका तुम्ही मेळाव्याला चला ” या शाळा प्रवेशाच्या मेळाव्यास गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

नायगाव तालुक्यातील बरबड्याच्या जिल्हा परिषद शाळेत केंद्रप्रमुख श्री रेडेवाड सरांच्या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत सोनूचा बाबा तुम्ही मेळाव्याला चला गणूचा काका तुम्ही मेळाव्याला चला ” या शाळा प्रवेशाच्या मेळाव्यास गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220330-WA0009.jpg

नायगाव तालुक्यातील बरबड्याच्या जिल्हा परिषद शाळेत केंद्रप्रमुख श्री रेडेवाड सरांच्या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत सोनूचा बाबा तुम्ही मेळाव्याला चला गणूचा काका तुम्ही मेळाव्याला चला ” या शाळा प्रवेशाच्या मेळाव्यास गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
गेल्या दोन वर्षापासून देशातील शिक्षण क्षेत्र कोरोना महामारीच्या तुफानी संकटामुळे हतबल झाले होते परंतु राज्यातला कोरोना मारामारीचा जोर कमी झाल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे शिक्षण क्षेत्र आता हळूहळू शिक्षण क्षेत्रात मोठी झेप घेत असल्याचे दिसून येत असून नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत केंद्रप्रमुख माधव रेडेवाड यांच्या विशेष उपस्थितीत केंद्रस्तरीय शाळा पूर्व तयारी मेळाव्याची सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असल्यामुळे सदरील कार्यक्रमाचे विद्यमान अध्यक्ष कुंटुर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख माधव रेडेवाड यांची विशेष उपस्थित सदर कार्यक्रम संपन्न करण्यात आला आणि बरबड्याच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत केंद्रप्रमुख माधव रेडेवाड यांच्या उपस्थित सोनूचा बाबा तुम्ही मेळाव्याला चला गणूचा काका तुम्ही मेळाव्याला म्हणून प्रभात फेरी काढण्यात आली आहे

नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील केंद्राचे मुख्याध्यापक गुंटे होते व त्याच बरोबर सदरच्या कार्यक्रमासाठी केंद्रा अंतर्गत येणाऱ्या सर्वच सन्मानिय पदोन्नत मुख्याध्यापक आणि शाळेचे शिक्षक व केंद्रांतर्गत सदरच्या अंगणवाडीच्या मॅडम वर्ग व मदतनीस उपस्थित राहून या प्रशिक्षणात शाळापूर्व तयारी मेळाव्याची गरज आणि आवश्यकता काय व मेळाव्याचे आयोजन शाळा स्तरावर कशा प्रकारे कराव्यात यांची परिपूर्ण माहिती केंद्र सुलभक राहुल भद्रे व अंबुलगे दत्ता यांनी दिली असून सदरचा मेळावा घेऊन प्रवेश पात्र मुलांची संख्या कशी वाढविता येईल याचे मार्गदर्शन ही विस्तार अधिकारी सुरेश पाटील आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून केले असून सात प्रकारच्या स्टॉलची मांडणी करत बालकांची शाळा पूर्व तयारी कशी करून घ्यावी हे या प्रशिक्षणात सर्चव विद्याविभूषित मुख्याध्यापक व शिक्षक व अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले असून ग्रामीण भागातील शिक्षक शिक्षण क्षेत्रात चांगल्या प्रकारे कामगिरी करीत असल्यामुळेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदर्श गुरु गौरव पुरस्कार देऊन शिक्षकाला सन्मानित करण्यात येत आहे

तालुक्यातील बरबडा येथे प्रशिक्षणात दिंडी काढून संगीतमय गीताद्वारे नुकतेच पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलेले पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक शिवाजी शेवाळे, सूरेवाड,प्रकाश कुंभारगावे यांनी मेळाव्याला ” चला तुम्ही मेळाव्याला चला ‘ शाळा प्रवेशाच्या मेळाव्याला चला ” या कार्यक्रमाने नागरिकाचे मने जिंकली आणि हे शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे गीत प्रभात फेरी द्वारे सादर केले, सुंदर रांगोळीच्या साह्याने शाळापूर्व तयारी प्रशिक्षणाची माहिती देण्यात आली सदरच्या कार्यक्रमास सरपंच म्हणून दमकोंडवार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून एम डी शिंदे रुई बु तर विद्यार्थी म्हणून धुळेकर तर विद्यार्थ्यांचे पालक म्हणून कुलकर्णी,अंगणवाडी ताई विठ्ठलकर मॅडम यांनी अतिशय चांगली भूमिका बजावली या कार्यक्रमास सूत्रसंचालन मार्गेपवार व आभार प्रदर्शन सूरेवाड यांनी मानले सदरचा बरबड्याच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आले असून यापूर्वी शासनाने सर्वशिक्षा अभियाना अंतर्गत जनजागृतीचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घेण्यात होते

anews Banner

Leave A Comment