Home नांदेड गोजेगाव येथे आठवडी बाजाराला प्रारंभ

गोजेगाव येथे आठवडी बाजाराला प्रारंभ

135
0

राजेंद्र पाटील राऊत

गोजेगाव येथे आठवडी बाजाराला प्रारंभ

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील गोजेगाव येथे नव्याने आठवडी भाजीपाला बाजाराला सुरुवात करण्यात आली आहे.
गोजेगाव हे गाव पंचक्रोशीतील मोठ गाव असून या गावाच्या शेजारील दहा ते बारा गावात भाजीपाल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने गोजेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील लोकांना भाजीपाला मिळावा म्हणून गोजेगाव ग्रामपंचायतीनी दर गुरुवारी आठवडी बाजार भरण्याचा योग्य निर्णय घेतला आहे.
या बाजारात गोजेगाव, मारजवाडी, आमदापुर, वळग, आंदेगाव,कोडग्याळ, गोणेगाव, सांगवी, ईटग्याळ, दरेगाव या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतीतील भाजीपाला आणुन बाजार सजविला होता. या आठवडी बाजारामुळे गावातील व बाहेर गावातील लोकांनी भाजीपालाही मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करण्यात आली आहे.
गोजेगाव नगरीत भाजीपाला विकुन शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी व गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केले आहेत. त्यामुळे
समस्त गावकऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी बबनराव पाटील गोजेगावकर, व उपसरपंच दिगांबर पाटील गोजेगावकर यांचा सत्कार करून समाधान व्यक्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here