आशाताई बच्छाव
राष्ट्रवादी पुन्हा का ?
पुणे ( वारजे )- युवा मराठा न्युज प्रतिनिधी विलास पवार.
राष्ट्रवादी पुन्हा का ?
गेल्या ९ वर्षांत भाजपच्या कडून आलेला प्रत्येक कार्यक्रम , प्रत्येक संघटनात्मक जबाबदारी , प्रत्येक निवडणुकीत कुठलाही स्वार्थ न ठेवता केलेला प्रचार कोणाच्याही एका पैशाला हात न लावता इमानदारीने पार पाडला .
२०१७ साली स्वीकृत नगरसेवक पदावर कार्यरत असताना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वसाधारण पुरुष गटात पराभव झाल्यानंतर ७ दिवसात पुन्हा सक्रिय होऊन काम करीत राहिलो ते गेल्या ६ महिनेपर्यत …
साधारण ६ / ८ महिन्यापूर्वीपासुन वरीष्ठांकडुन देण्यात येणारी सापत्नपणाची वागणूक लक्षात आल्यावर थोडे निवांत झालेनंतर काय होईल याची कल्पना असताना पक्षाकडे औपचारिकता म्हणून ऊमेदवारीची मागणी केली.
पक्षासाठी अतिशय चांगले काम करूनही आम्ही सक्षम नसल्याने ( त्यांच्या मते ) राष्ट्रवादी पक्षाच्या माजी नगरसेवक, नगरसेविका यांचे पक्षप्रवेश झाल्यावर त्याच दिवशी फोनवरून पक्षात त्यांचे मनापासून स्वागत केले.
संबंधितांचे पक्षप्रवेश झाले , त्यांची तिकिटे फायनल झाली. पक्षाच्या हितासाठी हा निर्णय मान्य करून भाजपच्या पोस्ट देखील टाकत राहिलो . यावर कुठेही नाराजी व्यक्त केली नाही . पक्षात राहुन ऊमेदवारांचा प्रचार करण्यासाठी तयार राहिलो . तसा शब्द ही ४ ऊमेदवारांना दिला.
यानंतर ऊमेदवार यांनी घेतलेल्या भाजपच्या बैठकीत मला कुठलाही निरोप दिला नाही . एवढ्यावरच न थांबता जी भाजपा वारजे परिसरात वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न, मेहनत याकडे दुर्लक्ष करून, कुठल्याही अपेक्षा न ठेवता मदत करण्याचे आश्वासन देऊन सुद्धा प्रचाराच्या नारळ वाढविण्याच्या कार्यक्रमाला साधे निमंत्रण देण्याचा मोठेपणा ही मंडळी दाखवु शकली नाहीत .
या एकुण परिस्थितीचा अंदाज घेऊन स्वतःच्या सन्मानाचा आदर ठेऊन मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादांच्या ऊपस्थितीत जाहीर प्रवेश केला तो कुठल्याही तिकीटासाठी नाही कारण तसे असते तर निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होऊ दिल्या नसत्या .
माझा आजही कुठल्याही केंद्रीय , राज्यस्तरीय , शहर पातळीवरील नेतृत्वांवर राग रोष नाही .
मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी आपल्या पक्षात दिलेल्या प्रवेशाबद्दल दादांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
माहितीसाठी सविनय सादर !!
आपला , सचिन दशरथ दांगट
मा.स्वीकृत नगरसेवक, पुणे मनपा






