Home पुणे आता पेट्रोल फक्तं ८६ रुपयांना लीटर लागले मिळायला! पुणेरी वाहनचालकांची उडाली झुंबड…

आता पेट्रोल फक्तं ८६ रुपयांना लीटर लागले मिळायला! पुणेरी वाहनचालकांची उडाली झुंबड…

169

आशाताई बच्छाव

1002317996.jpg

  • आता पेट्रोल फक्तं ८६ रुपयांना लीटर लागले मिळायला! पुणेरी वाहनचालकांची उडाली झुंबड…

पुणे (कोथरूड ):-प्रतिनिधी विलास पवार
पुण्यासह महाराष्ट्रात १०३-१०४ रुपयांच्या पुढेच पेट्रोलचे दर आहेत. गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले तरी इंधनाचे दर मात्र कमी झालेले नाहीत. अशातच इथेनॉल मिक्स करून झाले, तरीही सरकारने पैसे कमी केलेले नाहीत. परंतू, आज अचानक पुण्यातील कोथरुडमधील एका पेट्रोल पंपावर ८६ रुपयांना प्रति लीटर पेट्रोल मिळू लागल्याने मोठी झुंबड उडाली होती.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८६ व्या वाढदिवसाचे निमित्त होते. कोथरूड भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून एका पेट्रोल पंपावर ८६ रुपयांना पेट्रोल वाटप करण्यात आले. पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. दुपारपर्यंत सुमारे ७०० हून अधिक वाहनचालकांनी या सवलतीचा लाभ घेतला.
सध्या पुणे शहर आणि उपनगरात इच्छुक उमेदवार देवदर्शन, पर्यटन, साड्या वाटप यांसारख्या विविध कार्यक्रमांमधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोथरूडमधील ‘₹८६ पेट्रोल वाटप’ हा त्याच निवडणुकीच्या तयारीचा एक भाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Previous articleतरुण पिढीला मार्गदर्शनाची गरज -प्रकाश सोनवणे
Next articleहिवाळी अधिवेशनात माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची PWD मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे जिल्ह्याच्या विविध मुद्द्यांवर ठोस मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.