Home नागपूर तरुण पिढीला मार्गदर्शनाची गरज -प्रकाश सोनवणे

तरुण पिढीला मार्गदर्शनाची गरज -प्रकाश सोनवणे

132

आशाताई बच्छाव

1002313737.jpg

तरुण पिढीला मार्गदर्शनाची गरज -प्रकाश सोनवणे

संजीव भांबोरे
नागपूर –सध्याच्या काळात तरुण पिढी ही व्यसनामध्ये अधिक अडकत चालली आहे. पैसे कमावण्याचे सोपे उपाय शोधत आहे . महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात उच्च पदाधिकारी आहेत .मोठे उद्योजक आहेत. त्यांनी आताच्या पिढीला मार्गदर्शन करण्याची गरज आहे. व्यसनापासून दूर ठेवण्याची नितांत गरज आहे.परंतु ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत चुनाव दरम्यान मतदारांना दारूचे लालच दाखवून मतदारांना व्यसनाधीन करतात. त्यामुळे तो व्यक्ती सुद्धा व्यसनाधीनाच्या आहारी जाऊ शकतो. व्यसनाधीनतामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होतात. उघड्यावर पडतात. त्यामुळे ती व्यक्ती आपल्या मुलांना योग्य शिक्षण देऊ शकत नाही. व दारूवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात. त्याचप्रमाणे जोपर्यंत कुठलाही व्यक्ती आपल्या स्वतःच्या पायावर उभा होत नाही तोपर्यंत त्यांनी आपल्याला राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आजची तरुण मंडळी कितीही शिकली सवरली तरी त्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करावीच लागते. त्या त्याशिवाय त्यांचे भविष्याचे करिअर घडत नसते. यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. पुणे ,संभाजीनगर , मुंबई येथे 12 वी नंतर काम करत असलेल्या मुलांना काम करत असताना व्यावसायिक शिक्षण कसे घ्यायचे याकरिता शासन स्तरावर गावागावात मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत ब्ल्यू स्टार टीव्ही न्यूज चॅनेल चे मुख्य संपादक प्रकाश बळीराम सोनवणे यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांच्याशी बोलताना सांगितले .

Previous articleअकारी पडीत जमीन धारकांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच निर्णय
Next articleआता पेट्रोल फक्तं ८६ रुपयांना लीटर लागले मिळायला! पुणेरी वाहनचालकांची उडाली झुंबड…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.