Home पुणे कचऱ्यातील PPE कीट हाताने उचलतात पालिका कर्मचारी; त्यांना हातमोजे देऊ, अधिकाऱ्यांची वैचारिक...

कचऱ्यातील PPE कीट हाताने उचलतात पालिका कर्मचारी; त्यांना हातमोजे देऊ, अधिकाऱ्यांची वैचारिक दिवाळखोरी 🛑

122
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 कचऱ्यातील PPE कीट हाताने उचलतात पालिका कर्मचारी; त्यांना हातमोजे देऊ, अधिकाऱ्यांची वैचारिक दिवाळखोरी 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे – ⭕कोरोना रुग्णांची तपासणी, कोरोना रुग्णांची रुग्णवाहिकेतून वाहतूक आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यावर अंत्यसंस्कार करताना पिपिई कीटचा वापर केला जातो.

त्या काढल्यानंतर संबंधित व्यक्ती त्याची शासन नियमानुसार रीतसर विल्हेवाट लावतो. मात्र पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ठ झालेल्या शिवणे स्मशानभूमी जवळ उघड्यावर कचऱ्याप्रमाणे पडलेल्या पिपिई कीट उचलताना स्वच्छता कर्मचारी चेकमेट टाईम्सच्या कॅमेऱ्यात कैद झाल्यात. विशेष म्हणजे, जी महिला कर्मचारी या पिपिई कीट उचलत होती, त्यांच्या हातात हातमोजे अथवा कोणतीही सुरक्षा साधने नसल्याचे गंभीर वास्तव समोर आलंय. हे थोडे म्हणून की काय, यावेळी पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या देखील तेथे उपस्थित होत्या.

असे असतानाही आम्ही सदरील घटना घडल्यानंतर दोन तासांपेक्षा अधिक काळ ओलांडल्यावर वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात याबाबत विचारणा केली असता, कार्यालयात कोणालाही याबाबत कोणीही काहीही माहिती दिलेली नव्हती. तर एका अधिकाऱ्याने तर कहरच केला, चक्क “त्या महिलेला हातमोजे द्यायला हवे होते” असे म्हणत, आपली वैचारिक दिवाळखोरीच दाखवून दिली.

यावर विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

यानंतर आम्ही महापालिका सहायक आयुक्त संतोष वारुळे यांना ही बाब निदर्शनास आणून दिली असता, ते म्हणाले. ⭕

Previous articleअसगणी गावात पांडवकालीन स्वयंभु महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा 🛑
Next articleमनाचा मोठेपणा ..! घरकाम करणाऱ्या मुलीच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी थेट मावळमध्ये पोहचला जॅकी श्रॉफ 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here