• Home
  • हसनाळ(.प. मू.)येथे तहसीलदार काशिनाथ पाटील यांचा पाहणी दौरा…

हसनाळ(.प. मू.)येथे तहसीलदार काशिनाथ पाटील यांचा पाहणी दौरा…

हसनाळ(.प. मू.)येथे तहसीलदार काशिनाथ पाटील यांचा पाहणी दौरा… जाहूर,(मनोज बिरादर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-मुखेड तालुक्यातील हसनाळ (प. मू.) येथे तहसीलदार साहेब श्री काशिनाथ पाटील यांचा पाहणी दौरा दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी मुखेड चे तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांनी हसणार (प.मु.) पुनर्वसन गाव पहाणी दौरा करण्यात आला आहे. त्यांच्यासमवेत तलाठी श्री जांभळे व ग्रामसेवक श्री जिरगे आदी उपस्थित होते. हसनाळ ( प.मु.) गावातील नागरिकांना प्रत्यक्ष संवाद साधून मूलभूत सोयी सुविधा’रस्ते पाहणी व वीज इत्यादी प्रश्नावर गावकरी यांच्याशी संवाद साधला. या बैठक व पाहणी दौऱ्यात सर्वप्रथम कर्ज पुनर्वसन यादी सरकारी पुनर्वसन तपासणी यांची सर्वप्रथम तपासणीकरण्यात आली. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री शशिकांत देशपांडे यांनी वडिलोपार्जित संपत्ती मध्ये समानता व वारसा हक्क कायदा महिलांना पण वारसा हक्क मिळाला पाहिजे अशी मागणी केली ही बाब नागरिकाकडून चर्चेचा विषय ठरला असून यावेळी गावातील नागरिकांनी विविध समस्या तहसीलदार साहेबा समोर मांडण्यात आल्या यावेळी गावातील असंख्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment