Home Breaking News *कृषीविभागाची मोठी घोषणा: ३ लाख १४ हजार क्विंटल नवीन वाण वाटणार:*

*कृषीविभागाची मोठी घोषणा: ३ लाख १४ हजार क्विंटल नवीन वाण वाटणार:*

82
0

*कृषीविभागाची मोठी घोषणा: ३ लाख १४ हजार क्विंटल नवीन वाण वाटणार:*
जाहूर,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
*यंदा चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी भरपूर पाणी आणि पोषक वातावरण असणार आहे.त्यामुळे कृषी विद्यापीठाने नवीन सुधारीत आणि संकरित बियाणांचा प्रसार करण्याचं ठरवलं असून,ते यंदा गहू,रब्बी ज्वारी,करडई,मका,हरभरा,जवस ह्या बियाणांचे वाटप राज्यभर करणार आहेत.विविध योजनेअंतर्गत हे वाटप अनुदान स्वरूपात होईल.*

यासाठी सरकारने तब्बल ६३ हजार कोटींची तरतूद केली असल्याचं कृषी मंत्री दादा भुसेंनी ह्यावेळी स्पष्ट केलं.१० वराह आतील नवीन बियाणांच्या वाणांसाठी गहू २००० रुपये क्विंटल,मका ७५०० रुपये क्विंटल आणि रब्बी ज्वारी रुपये ३००० क्विंटल ह्या किमती ठरवण्यात आल्या आहेत.ही बियाणे पुरविण्याकरिता महाबीज,कृभको आणि राष्ट्रीय बीज निगम यांना सामील केल गेलं आहे.

*दरवर्षी पेक्षा यावर्षी परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याने कृषी खात आणि शासन पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करत असतांना दिसत आहे.२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार आता कागदावरून जमिनीवर मूळ स्वरूप अस्तित्व घेत आहे म्हणूनच फक्त बियाणे वाटप यावर न थांबता कृषी विभाग विविध योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक देणार आहे.शेत जमीन विस्तार आणि उत्पादनक्षमतेत वाढ करणे हाच या प्रात्यक्षिक घेण्यामागचा मूळ हेतू आहे.सद्यस्थितीत गहू १८३० हेक्टर,हरभरा २१८२१ हेक्टर,मका २९५ हेक्टर रब्बी ज्वारी२४६० हेक्टर,करडई १५१०हेक्टर,जवस १०५०हेक्टर,ऊस पिकात आंतरिक हरभरा २५०० हेक्टर असं एकूण ३६ हजार ४६४ हेक्टर जमीन ह्या प्रात्यक्षिकांसाठी वापरली जाणार आहे.*

अन्नसुरक्षा अभियान,बियाणे व लागवड उपअभियान(ग्रामबीजोत्पादन) अश्या योजनांचा विशेष उपयोग केला जाईल.या उपक्रमामुळे शेती उत्पादन वाढेल असा विश्वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

Previous articleहसनाळ(.प. मू.)येथे तहसीलदार काशिनाथ पाटील यांचा पाहणी दौरा…
Next article*महाविकास आघाडी लढवणार* *पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here