• Home
  • बैलशर्यत सुरु होणेबाबात मा.खा.राजू शेट्टींना अविनाश गुरव यांचे निवेदन

बैलशर्यत सुरु होणेबाबात मा.खा.राजू शेट्टींना अविनाश गुरव यांचे निवेदन

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210203-WA0102.jpg

बैलशर्यत सुरु होणेबाबात मा.खा.राजू शेट्टींना अविनाश गुरव यांचे निवेदन

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील भादोले गावातील एका बैलाच्या वाढदिवसाला आलेल्या माजी. खासदार राजू शेट्टी साहेब यांना शर्यत सुरू होणेबाबत निवेदन देण्यात आले. ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी बैलगाडी शर्यत गरजेची असून राज्यशासनाने अध्यादेश काढून बंदी घातलेल्या बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा सुरु कराव्यात. यासाठी शेतकरी संघटनेचे नेते मा.खा.राजू शेट्टी साहेब यांनी सुद्धा जातीने लक्ष घालावे. व शर्यत सुरू होणेसाठी प्रयत्न करावा अशा आशयाचे निवेदन अविनाश गुरव (भादोले) यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हातकणंगेले विधानसभा अध्यक्ष मा. संदेश भोसले यांच्या मार्गदर्शानाखाली दिले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्याला बैलगाडी शर्यतींची मोठी परंपरा आहे. ग्रामिण अर्थकारण या शर्यतीच्या खेळांवर अंवलंबून आहे. बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने व्यापारी वर्ग, वाहतूक व्यावसायिक, छोटे व्यावसायिक, बैलगाडी व्यवसायिक यांची नाळ या व्यावसायाशी जोडली गेली आहे. बैलगाडी शर्यती बंदीचा निर्णय झाल्यापासून या खेळाशी निगडीत सर्व व्यवसायांना मंदीचे दिवस आले आहेत, ही मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि येथील अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी शर्यती सुरु करणे हाच एकमेव पर्याय आहे.
महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीमध्ये खिलार ह्या जातीचे बैल वापरले जात असतात. खिलार ही जमात देशी गाईचा वंश म्हणून ओळखली जाते. खिलार जातीचे बैल शेतीमध्ये मशागत करण्यासाठी चांगल्या जातीचे बैल म्हणून ओळखले जात असतात. या बैलांची शाररिक क्षमता वाढविण्यासाठी शर्यत सारख्या खेळांची गरज आहे. शासनाने या सार्‍या गोष्टींचा तातडीने विचार करण्याची आवश्यकता आहे.
क्रिडा प्रेमींचा उत्साह वाढण्यासाठी बैलगाडी शर्यत हा ग्रामिण भागातील एकेकाळी महत्वाचा खेळ मानला जात होता. या खेळाशी ग्रामिण भागातील लाखो तरुणांचे भावनिक नाते आहे. ग्रामिण भागात यात्रोत्सवात भरविण्यात येणार्‍या बैलगाडी शर्यतींच्या निमित्ताने होणारी अर्थिक उलाढाल ही मोठी आहे. या बाबींचा विचार करुन बैलगाडी शर्यत सुरु होणेकरिता आपण लक्ष घालावे..
निवेदन देतेवेळी विजय पाटील , अनिल अवघडे , राहूल पाटील , शिवाजी खुपेरकर , संकेत पाटील , भूषण पाटील आदी उपस्थित होते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment