Home मुंबई महापालिकांच्या निवडणूका जाहिर! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होणार..? पक्ष...

महापालिकांच्या निवडणूका जाहिर! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होणार..? पक्ष फुटी नंतर राजकारण तापले

346

आशाताई बच्छाव

Screenshot_20230707-173025_Google.jpg

महापालिकांच्या निवडणूका जाहिर! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होणार..? पक्ष फुटी नंतर राजकारण तापले

ठाणे (अंकुश पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा सातारा जिल्हा प्रतिनिधी, दैनिक युवा मराठा न्युज पेपर अँड चॅनल)

महाराष्ट्रातील जनतेला गेले २ वर्षा पासून राजकीय नेत्यांच्या खेळत अधिक रस येऊ लागला होता. त्यात पक्ष फुटी नंतर अनेक नेत्याचे रुसवे फुगवे बाहेर आले. युत्या अधाद्या झाल्या पण आता यात निवडणूक आयोगाने एन्ट्री घेतली आहे. एका परिपत्रणवये गेले ३ वर्ष पासून राहिलेल्या महानगर पालिका,पोट निवडणुका,ग्रामीण भागातील निवडणुका ह्या येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता सर्वच नेते मंडळी,पक्ष ,कार्यकर्ते यांना निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे त्यात च पक्ष फुटी मुळे अधिक तर नेते चिंतातुर झाले असतील. परिपत्रकात असे नमूद आहे की, औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा ४०) च्या कलम १९, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५) च्या कलम १३ तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) चे कलम १२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, दिनांक १ जुलै, २०२३ या दिवशी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या माहे सप्टेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषदा/नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समित्यातसेच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक / पोटनिवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येतील असे अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत .
.

Previous articleरोखठोक संपादकीय… व-हाणे प्रकरणात कारवाई ऐवजी चौकशीचा खेळ…!
Next articleमालेगांव कॅम्प शिवसेना उपविभाग प्रमुखपदी श्री. नरेश सुभाष जगताप यांची निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.