Home संपादकीय रोखठोक संपादकीय… व-हाणे प्रकरणात कारवाई ऐवजी चौकशीचा खेळ…!

रोखठोक संपादकीय… व-हाणे प्रकरणात कारवाई ऐवजी चौकशीचा खेळ…!

285
0

राजेंद्र पाटील राऊत

20230627_182239-BlendCollage.jpg

रोखठोक संपादकीय…
व-हाणे प्रकरणात कारवाई ऐवजी चौकशीचा खेळ…!
वाचकहो,
गेल्या तीन वर्षापासून आम्ही व-हाणेतील पत्रकार भवन व सामाजिक अन विधायक कार्यासाठी जागा मागणीच्या मुद्द्यावर ठाम आहोत.सन २०२० पासून आजतागायत सदरची जागा सार्वजनिक पाणपोई चालविण्यासाठी आमच्या ताब्यात व वापरात आहे.व-हाणे ग्रामपंचायतीच्या मुठभर लोकांनी हि जागा चांगल्या व सामाजिक कार्याला मिळूच नये,म्हणून केविलवाणा आटापिटा चालविला आहे.प्रत्यक्षात ती जागा एका गर्भश्रीमंताच्या घश्यात घालण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरु आहे.व-हाणेतील या जागा प्रश्नावर आम्ही अनेक आंदोलने केलीत.व-हाणे ग्रामपंचायतीने केलेले आजपर्यंतचे काळे गोरे धंदे व कागदोपत्री खोटे नाटे कारनामे चव्हाटयावर आणलेत.त्यामुळेच नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकिरी आशिमा मितल यांनी नेमलेल्या चौकशी समितीने आपल्या अहवालात स्पष्ट म्हटले की,मालेगांव पं.स.चे गटविकास अधिकारी यांनी कागदोपत्री खोटया सहया,व प्रोसेडींग बुकाची पडताळणी करुन गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी.मात्र दुर्दैवाची बाब अशी की,मालेगांव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी बोगस कागदपत्रे व बनावट सहयांची पडताळणी करुन प्रत्यक्षात कार्यवाही न करता,चौकशीचे फार्स नाटय रंगवले.आणि आम्हांला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार आम्ही गेल्या तीन वर्षापासून लढतोय,आंदोलने करतोय त्याला फारसे महत्त्व न देता व-हाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचाने दिलेल्या स्पष्टीकरणाला मोठेच महत्त्व देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार दिसून आला.प्रत्यक्षात आम्ही व-हाणे गावचे रहिवाशी किंवा मतदार नक्कीच नाहीत.हे सगळ्यांनाच माहित आहे.परंतु अज्ञानपणाचा बुरखा पांघरलेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांना एवढी अक्कल असू नये की,जागा मागणी आम्ही स्वतः वैयक्तिक केलेली नसून त्या जागेची मागणी तेथीलच स्थानिक रहिवाशी व मतदार श्रीमती अलका बच्छाव यांनी केलेली आहे.त्याशिवाय आम्ही बाहेरगावचे लोक जागा हडप करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आमच्यावर करताना ग्रामपंचायत प्रशासनाने आपली अक्कल कुठे गहाण ठेवलेली होती.जागा हडप करण्याचा साधा सोपा अर्थ जर ग्रामपंचायत प्रशासनाला कळत नसेल तर त्यांच्या बुध्दीची किव करावीशी वाटते.सदरची जागा हडप नव्हे तर शासनाचा प्रतिनिधी या नात्याने तत्कालीन ग्रामसेविका यांनी स्वतः च त्या जागेवर सार्वजनिक पाणपोईचे उदघाटन केले.व तसा मासिक मिटींगमध्ये ठराव पारित करुन निर्णय घेण्याचे मान्य केले.पण नंतरच्या काळात ग्रामसेविकेने गावातल्या भुरटया राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून सदरचा प्रश्न हेतुपुरस्कर रेंगाळत ठेवला.तर याच ग्रामसेविकेने नंतरच्या काळात सांगितले की,सदरची जागा पत्रकार भवनसाठी देता येणार नाही,तर तुमची संस्था असल्यास देता येईल.आणि त्यासाठी स्वतः ग्रामसेविकेने अलका बच्छाव यांच्याकडून रोख पन्नास हजार रुपये घेऊन हि जागा ताब्यात दिलेली आहे,अशाच प्रकारे ग्रामसेविकेने त्याच गावातल्या अनेक शासकीय जागाचा कागदोपत्री खेळखंडोबा करुन ठेवलेला आहे.त्यामुळेच व-हाणे गावी सन २०२१ या वर्षी शासनमान्य आश्रयआशा फाऊंडेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली.आज रोजी त्या संस्थेवर त्याच गावातील स्थानिक रहिवाशी व मतदार राजेंद्र तुकाराम पवार, अलका शांतीलाल बच्छाव, प्रशांत शांतीलाल बच्छाव हे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.आणि जागा मागणी देखील स्थानिक रहिवाशी व मतदार असलेल्या अलका बच्छाव यांनीच केलेली असल्यामुळे आमच्यावर जागा हडप करण्याचा ग्रामपंचायतीचा दावा सपशेल फोल ठरतो आहे.ज्या गावात ग्रामपंचायतीच्या सडकछाप भामटयांच्या मदतीने महत्त्वाचे जागा हडपण्यात आल्यात,तेथे आजपर्यंत प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केलेली नाही.एक संस्थाचालक या नात्याने व-हाणे प्रकरणात आपल्याच माणसाच्या पाठीशी उभा राहून आम्ही हि लढाई कागदोपत्री लढत आहोत,तर व-हाणे ग्रामपंचायतीने केलेल्या खोटया नाटया व बनावट सहया प्रकरणात प्रशासनाने कार्यवाही करु नये म्हणून कांगावा करुन अप्रत्यक्षपणे प्रशासनाला आदेश देणारे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणजे कोतवालाने तहसिलदाराला आदेश करण्यासारखा हा प्रकार आहे.आम्ही आमच्या मागणीवर ठाम असून,आम्हांला चौकशी नको तर प्रत्यक्ष कार्यवाही प्रशासनाकडून अपेक्षित आहे.आणि त्यासाठीच येत्या ११ जुलै रोजी होणारे उपोषण आंदोलन हे अटळच आहे.

Previous articleदत्तोपंत पा. पोहेकर यांचे निधन
Next articleमहापालिकांच्या निवडणूका जाहिर! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होणार..? पक्ष फुटी नंतर राजकारण तापले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here