Home संपादकीय सुख दुःखाचे साथीदार (आयुष्यातील घडामोडीचा रोखठोक आढावा)!       

सुख दुःखाचे साथीदार (आयुष्यातील घडामोडीचा रोखठोक आढावा)!       

72
0

राजेंद्र पाटील राऊत

FB_IMG_1712106466744.jpg

“सुख दुःखाचे साथीदार (आयुष्यातील घडामोडीचा रोखठोक आढावा)!                                  वाचकहो, माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसते फक्त आणि फक्त श्वास असतो.आणि मरतो तेव्हा त्याला नाव असते पण श्वास नसतो,या जीवनाच्या प्रवासातील अत्यंत महत्वाचा जो काळ म्हणून माणूस जगतो त्यालाच जीवन असे म्हणतात! आणि नेमके याच काळात माणूस नेमके जगला कशासाठी? अन् कुणासाठी? यामुळेच तर त्याचे नाव मेल्यानंतर सुध्दा लक्षात राहते.कुणी नाव कमावण्यासाठी जीवाची आगपाखड करून पराकाष्ठा पणाला लावतो.तर कुणी नाव बदनाम करण्यासाठी क्षणार्धात कमावलेली सगळी मातीमोल ठरवितो.हा झाला ज्याचा त्याचा वैयक्तिक जगण्याचा अधिकार व अधिभार…पण आपण माणूस म्हणून कुणासाठी काय जगलोत हा अनमोल संदेश किती जणांच्या अंगवळणी पडेल हे निश्चितच रुचणारे ठरणार नाही आणि आमच्या अग्रलेखाचे शिर्षक वाचून देखील बहुतांश जणांना हेच वाटेल की,सुख दुःखाचे साथीदार कोण तर…बस आपली बायको,मुले नातेवाईक आप्तस्वकीय मात्र खरेच हे सत्य आहे का? या यक्ष प्रश्नाचे उत्तर आजही कित्येकांना सापडलेले नाही.पण…जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले,तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.ही संत उक्ती ज्यांनी ज्यांनी आचरणात आणली ते आज धनाने किंवा घबाडाने गर्भश्रीमंत नाहीत तर मानवतेच्या शिखरावर विराजमान होऊन मानवरुपी कमावलेल्या धनाने निश्चितच श्रीमंत आहेत.त्यातलाच एक महत्त्वाचा दुवा ठरला आहे तो म्हणजे”युवा मराठा” सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी हे ब्रीदवाक्य सोबत घेऊन प्रत्यक्ष तसेच आचरणात आणणारा “युवा मराठा” सदैव दिनदुबळयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.संकटात अडचणीत सापडलेल्यांचा भरभक्कम आधार ठरला.मात्र क्षणिक स्वार्थासाठी कधी तडजोड केली नाही अथवा कधी कुठे हातमिळवणी केली नाही हीच खरे तर आमची जमेची बाजू आहे.सत्याच्या पाठीशी उभे राहून लढताना कधी हा विचार केला नाही की,समोर कोण उभा आहे फक्त आणि फक्त अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारसरणी नुसार मिळत गेली म्हणूनच आजवर येथपर्यंतची लढाई संघर्षाच्या बळावर लढता आली.”युवा मराठा”कधी कुणाच्या आईच्या रुपात उभा राहिला तर कधी बापाच्या रुपात पण समोरच्यांना हिंमत जिद्द आत्मविश्वास या त्रिसुत्री बहुगुणी मुलमंत्र देऊन घडवीत राहिला.”युवा मराठा”ने सगळ्या जातीधर्मातील माय माऊल्या या आमच्या मातेसमान हे तत्व अंगिकारल्याने आज “युवा मराठा” महाराष्ट्राच्या नकाशावर झळकताना दिसतोय.जीव भावाची सगळ्याच जातीधर्माच्या अठरा पगड जाती व बारा बलुतेदार सहका-यांना सोबत घेऊन चालताना “युवा मराठा”ने कधीच आर्थिक अपेक्षा केल्या नाहीत किंवा कुठे तोडयापाण्या केल्या नाहीत हे सगळे लिहण्याचा उद्देश एवढाच की, प्रामाणिकपणे काम करीत असताना अनेक संकटे अडचणींना सामोरे जाऊन आज आम्ही तुमच्या समोर निधड्या छातीने खंबीरपणे उभे आहेत.तसे बघितले तर वृत्तपत्र सृष्टीशी आमची नाळ ही वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच जोडली गेली अनेक नामांकित वृत्तपत्रात काम केले.संपुर्ण महाराष्ट्रभर भटकंती केली.पण “युवा मराठा”चे रोपटे लावताना लहानपणाची साथीदार व सुख दुःखात सहभागी होणाऱ्या “युवा मराठा”च्या व्यवस्थापकीय संपादक यांना देखील विसरता येणार नाही.कारण आजचा “युवा मराठा “चा हा वटवृक्ष त्यांच्यामुळेच उभा राहिलेला आहे.आमच्या सोबत अनेक आलेत आणि गेलेत पण जे एकनिष्ठता बाळगून आजही आमच्या सोबतच आहेत त्यांच्याशी या जन्मी तरी आमच्या कडून प्रतारणा किंवा गद्दारी होणार नाही.मग ते प्रेम असो की, माणुसकी आम्ही आपल्या सगळ्यांच्या प्रेमावरच “युवा मराठा “जीवंत ठेवला आहे व राहील एव्हढेच यानिमित्ताने! राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक

Previous articleश्री बाकलीवाल विद्यालयाचा माजी विद्यार्थी झाला उपशिक्षणाधिकारी
Next articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेच्या भंडारा जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा आशिष चेडगे यांची फेरनिवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here