Home Breaking News 🛑 गुन्हा दाखल होताच ” वाघ ” झाला पसार 🛑

🛑 गुन्हा दाखल होताच ” वाघ ” झाला पसार 🛑

90
0

🛑 गुन्हा दाखल होताच ” वाघ ” झाला पसार 🛑
✍️ अहमदनगर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अहमदनगर :⭕ कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असताना न्याय मागणेसाठी गेलेल्या महिलेस कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याने जाळ्यात ओढले होते.

वाघ याने लग्नाचे अमिश दाखवून पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला तसेच तिचा गर्भपात केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

कोतवाली पोलिस ठाण्याचा तत्कालीन निरीक्षक विकास वाघ याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. स्त्रीलंपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अधिकाऱ्याची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत.

त्यामुळेच काही दिवसांपूर्वी त्याची आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली. कोतवाली पोलिस ठाण्याचा पदभार मिळाल्यानंतर काही दिवसातच वाघ याने आपले रंग दाखवले.

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेशी ओळख वाढवून तिच्यावर अत्याचार करण्यापर्यंतची मजल त्याने मारली. जीवे मारण्याची धमकी देत वाघ याने महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला.

त्यातून पीडित महिला गर्भवती राहिली. त्यानंतर वाघ याने तिला जीवे मारण्याची धमकी देत गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या.

अखेर या अत्याचाराला त्रासलेल्या पीडित महिलेने कोतवाली पोलिस ठाणे गाठत वाघ याच्या विरोधात फिर्याद दिली.

गुन्हा दाखल होताच वाघ पसार झाला….⭕

Previous article🛑 संभाजीराजेंच्या भूमिकेला थेट विरोध :- सुरेश पाटील 🛑
Next article🛑 एमएचटी सीईटीच्या परीक्षा आज पासून सुरु 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here