• Home
  • 🛑 एमएचटी सीईटीच्या परीक्षा आज पासून सुरु 🛑

🛑 एमएचटी सीईटीच्या परीक्षा आज पासून सुरु 🛑

🛑 एमएचटी सीईटीच्या परीक्षा आज पासून सुरु 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 1ऑक्टोबर : ⭕ इंजिनियरिंग, मेडिकल, फार्मसी, ऍग्री आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षेला १ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातून ४ लाख ३२ हजार १० विद्यार्थ्यांनी नोंदणी तर राज्याबाहेरील १९ हजार ८९६ विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा परराज्यातील विद्यार्थ्यांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या एमएचटी-सीईटीच्या परीक्षांचे वेळापत्रक ९ ऑगस्टला राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने जाहीर करण्यात आले होते. एमएचटी-सीईटीच्या परीक्षा १ ते २० ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. ही परीक्षा दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात पीसीबी (फिजिक्स-केमिस्ट्री-बायोलॉजी) ग्रुपची परीक्षा असून ही परीक्षा १,२,४,५,६,७,८,९ या तारखांना तर दुसऱ्या टप्प्यात पीसीएम (फिजिक्स-केमिस्ट्र-मॅथ्स) ग्रुपच्या परीक्षा १२,१३,१४,१५,१६,१९,२० या तारखांना होणार आहेत. एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून ४ लाख ३२ हजार १० विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. १ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या पीसीबी ग्रुपच्या परीक्षेसाठी राज्यातून १ लाख ९२ हजार ७५ विद्यार्थ्यांनी तर परराज्यातून ३२०० विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. त्याचप्रमाणे पीसीएम ग्रुपच्या परीक्षेसाठी राज्यातून १ लाख ५० हजार ८९ विद्यार्थी तर परराज्यातून १६ हजार १८ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. पीसीएम व पीसीबी या दोन्ही ग्रुपसाठी राज्यातून ८९ हजार ८४५ तर परराज्यातून ६७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातून झालेल्या नोंदणीमध्ये पुण्यातून सर्वाधिक ४०,६६१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्याखालोखाल मुंबई २५४१७, अहमदनगर २५२८७, नाशिक २२६०७, नागपूर २२५५६, ठाणे २३१२० या जिल्ह्यातून नोंदणी झाली आहे. त्याचप्रमाणे परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. मध्य प्रदेशमधून सर्वाधिक २८७४, उत्तर प्रदेश २४७०, बिहार २१७६, गुजरात १६७९, कर्नाटक १३२९ या राज्यातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे.

यंदा परीक्षा तालुकास्तरावर घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक व माहितीसाठी सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.⭕

anews Banner

Leave A Comment