Home अमरावती एकाच घरावर दोनदा कर्ज, एसबीआयचे ३० लाख हडपले.

एकाच घरावर दोनदा कर्ज, एसबीआयचे ३० लाख हडपले.

35
0

आशाताई बच्छाव

IMG_20240318_183042.jpg

एकाच घरावर दोनदा कर्ज, एसबीआयचे ३० लाख हडपले.
————
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेमधून ३० लाख रुपयाचे कर्ज मंजूर करून घेतेवेळी आरोपी महिलेने अभियंता कॉलनी, नवसारी या भागातील बांधलेले घर बँकेकडे गाहाण ठेवले होते. बनावट कागदपत्र देऊन येथील जुना कॉटन मार्केट स्थिती एसबीआयच्या कृषी विभाग शाखेचे३० लाख रुपयांनी फसवनूक करण्यात आली.३१ जुलै२०२०ते१६ मार्च २०२४ दर्मान हा प्रकार घडला. दोन आरोपींनी बँकेला कुठलीही पूर्वकल्पना न देता खोटी दस्तऐवज व बनावट कागदपत्र तयार करून ३० लाख रुपयाचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याची तक्रार क्षत्रिय प्रबंधक संजोग भागवत कर वय ४६ यांनी केली. त्या आधारे सिटी कोतवाली पोलिसांनी १६ मार्च रोजी रात्री आरोपी दीपक नारायण ढोरे व एक महिला दोघेही राहणार अमरावती याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले एकाच घरावर दोनदा कर्जाची उचल करण्यात आली. अर्थात एकच घर दोन बँक ठेवण्यात आले. स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेमधून ३० लाख रुपयाचे कर्ज मंजूर करून घेते वेळी महिला आरोपींनी अभियंता कॉलनी नवसारी या भागात बांधलेले घर बँकेकडे गहाण ठेवले होते ते बँकेच्या हक्कात लिहून दिले. त्या घराची कागदपत्रे अमरावती महानगरपालिकेत कर आकारणीसाठी जमा केल्याचे व अन्य कुठल्याही बँकेतून वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले नसल्याचे प्रतिज्ञापत्र आरोपीने बँकेला दिले. मूळ खरेदी सुद्धा एसबीआय कडे जमा केली नाही. मात्र, दीपक ढोरे यांनी देखील सन२०१० मध्ये अन्य एका सहकारी बँकेतून कर्ज घेताना तेच घर त्या बँकेला गहाण ठेवले असल्याची माहिती उघड झाली. त्यानंतर त्या संपूर्ण प्रकरणाची बँकेच्या वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाल्यानंतर दीपक ढोरे व त्या महिलेने एसबीआयच्या कृषी विकास शाखेतून बनावट जास्त वेळ देऊन, ३० रुपयाचे कर्ज बेकायदा घेतल्याचे लक्षात आले.

Previous articleमाळी घोगरगाव येथे पवित्र क्रसाच्या वाटेची भक्ती मोठ्या भक्ती भावाने संपन्न
Next articleश्रीक्षेत्र विसापूर येथे २७ पासून त्रैदिनी कीर्तन महोत्सव
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here