Home पुणे उरळगाव येथे तात्काळ १२० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले

उरळगाव येथे तात्काळ १२० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले

106
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 उरळगाव येथे तात्काळ १२० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे/शिरूर मु. उरळगांव :-⭕रुग्णांची वाढती संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर निर्माण होणारा ताण लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.सुजाता पवार यांनी पुढाकार घेऊन केवळ २ दिवसात हे सेंटर उभे केले. व श्री रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर त्याचे उद्घाटन केले.

हे सेंटर पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महसूल विभाग व राव-लक्ष्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने चंद्रभागा मंगल कार्यालयात सुरू केले आहे. या कामासाठी मंगल कार्यालयाचे मालक श्री.प्रशांत सात्रस यांनी मदत करून मोठेपणा दाखवला आहे. याबद्दल त्यांचे आभार. परिसरातील अनेक ग्रामपंचायतींनी सुद्धा मोठ्या प्रमाणात विविध स्वरूपात मदत केली आहे. यापुढेही समाजातील दानशूर व्यक्ती या सेंटरला विविध स्वरूपात मदत करतील अशी आशा वाटते.

या कोविड सेंटरमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन आवश्यक ती खबरदारी घेऊन आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.

तहसीलदार श्री.एल .डी. शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्री.दामोदर मोरे, गटविकास अधिकारी श्री.विजयसिंह नलावडे, रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री.शिवाजी वडघुले, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री.विकास शिवले, माजी संचालक श्री.कांतीलाल होळकर, माजी सरपंच श्री.प्रशांत सात्रस, सरपंच श्री.सोमनाथ बेंद्रे, शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष श्री.राजेंद्र नरवडे, डॉ.श्रीमती इंदिरा डॅनियल, श्री.बाळासाहेब वागचौरे, श्री.अशोक चव्हाण, माजी उपसरपंच श्री.राजेंद्र गिरमकर, श्री.वाल्मीक सातकर, श्री.नानाभाऊ सात्रस, माजी सरपंच श्री.संतोष दौंडकर, श्री.अशोक कोळपे, सरपंच श्रीमती सारिका गजानन जांभळकर, श्री.नामदेव गिरमकर, ग्रामसेवक श्री.निलेश लोंढे, श्री.राजेंद्र सांत्रस, श्री.जया शिरसाट, श्री.गोविंद सुरवसे, सरपंच श्रीमती कमल प्रकाश शिवले आदी मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले. ⭕

Previous articleदेशावर संकट येताच बघा पळून चालले’, रातोरात न्यूयॉर्कला जाणारे शाहरुख खानचे कुटुंब नेटकऱ्यांकडून ट्रोल…! 🛑
Next articleव्यापाऱ्याकडे सापडला सात लाखांचा बेकायदा गुटखा आणि विदेशी सिगारेट….! 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here