• Home
  • लातूर जिल्ह्याच्या योजनांसंदर्भात आढावा बैठक ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

लातूर जिल्ह्याच्या योजनांसंदर्भात आढावा बैठक ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑लातूर जिल्ह्याच्या योजनांसंदर्भात आढावा बैठक 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

लातूर :⭕शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहातआयोजित लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसंदर्भात आढावा घेतली. गावात राहणाऱ्या प्रत्येक कुटूंबा पर्यत बारमाही पाणी पुरवठा करण्यासाठी लातूरचे वेगळेपण निर्माण करण्यासाठी नाविण्यपुर्व संकल्पना राबवावी असे निर्देश यावेळी संबधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री एस. कायंदे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी, ग्रामपंचायतीने पाणीपट्टीचे वसुली शंभर टक्के केली पाहिजे यादृष्टीने नियोजन करावे, पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यात बारामाही पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या गावांची यादी सादर करावी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पाण्याचा कायमचा स्त्रोत असलेली किमान एका तरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना यशस्वीपणे चालवावी आदी सुचनाही यावेळी केल्या आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment