Home Breaking News औश्री तुळजा भवानी मातेची मुर्ती प्रथापरंपरेनुसार सुर्यग्रहणानिमित्त सोवळ्यात ठेवली जाणार…अमरराजे कदम परमेश्वर...

औश्री तुळजा भवानी मातेची मुर्ती प्रथापरंपरेनुसार सुर्यग्रहणानिमित्त सोवळ्यात ठेवली जाणार…अमरराजे कदम परमेश्वर [अध्यक्ष भोपे पुजारी मंडळ तुळजापूर] ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

298
0

🛑 औश्री तुळजा भवानी मातेची मुर्ती प्रथापरंपरेनुसार सुर्यग्रहणानिमित्त सोवळ्यात ठेवली जाणार…अमरराजे कदम परमेश्वर [अध्यक्ष भोपे पुजारी मंडळ तुळजापूर] 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

तुळजापूर ⭕:- कंकणाकृती सुर्यग्रहणानिमित्त आज दि.२१ जून २०२० रोजी श्री तुळजा भवानी मातेची मुर्ती पुर्वापार प्रथेप्रमाणे पांढ-या श्वेत कपड्यात(सोवळ्यात) ठेवली जाणार अशी माहिती देविचे मुख्य भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी दिली आहे.भारतातील प्रमुख देवस्थाने या काळात बंद ठेवली जात असतात.तुळजापूरची तुळजा भवानी मातेची जुनी परंपरा आहे की श्वेत कपड्यात भक्तांना देविचे दर्शन दिले जाते परंतू भोपे पुजा-यांकडून ग्रहण कालावधीत देविची कुठलीही धार्मिक विधी केली जात नसते.ग्रहण स्पर्श कालावधी पुर्वी १५ मिनीटे अगोदरच श्रीदेविच्या अभिषेक पुजेची घाट श्रीचे निर्माल्य विसर्जन व स्पर्श होताच श्रीच्या मुर्तीस शुद्ध पाण्याने पाळीवाला मुख्य भोपे पुजारी यांच्याकडून स्नान घालून हळदकुंकू लावून श्वेत वस्त्र पांघरू घालून देविला सोवळ्यात ठेवले गेले.या ग्रहण कालावधीत नैवेद्य तयार करू नये,व नैवेद्य दाखवू नये,तसेच काही खाऊ नये असे संकेत पुर्वापार रूढीपरंपरेने भोपे पुजारी व मंदिर संस्थान पाळत आलेले आहे.पहाटे ४:३० वाजता निंबाळकर दरवाजा खुला करून देविचे चरणतीर्थ धार्मिक विधी ५ ते १५ वाजेपर्यंत होईल.६ वाजता अभिषेक पुजा करून धुपारती केली गेली.त्यानंतर ९:५० ते १० वाजून ८ मिनिटापर्यंत देविला निर्माल्य विसर्जन गेले गेले यानंतर सकाळी १० वाजून ८ मिनिटा
पासून ते १ वाजून ३७ मिनीटापर्यंत देविला श्वेत वस्त्रात सोवळ्यामध्ये ठेवले गेले.परत दुपारी१:३८ पासून ते ३:०० वाजेपर्यंत देविस अभिषेक पुजा,वस्त्रालंकार,आरती व धुपारती केली जाणार आहे. ग्रहण कालावधीनंतरच्या पुढील सर्व धार्मिक विधी पुर्वीप्रमाणेच केली जात असते.देवि भक्तांनी ग्रहण मोक्षा नंतर स्नान,दान आणि नेवेद्य करावेत.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here