🛑 सैन्यदलात नोकरी मिळवून देण्याबाबत बेरोजगारांची होतीय फसवणूक 🛑
✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
*”🛑 जाहिर आवाहन🛑 “*
बेरोजगार तरूणांकडून *”भारतीय सैन्यदलात तसेच इंडीयन नेव्ही”* मध्ये नोकरी लावण्यासाठी लाखो रूपये घेवून त्यांची फसवणूक केलेबाबत *तोतया नेव्ही अधिकारी आकाश काशिनाथ डांगे वय २५ वर्षे रा.भाडळी बु॥ ता.फलटण जि.सातारा व त्याचा साथीदार नितीन तानाजी जाधव वय ३० वर्षे रा.कल्पनानगर, बारामती* या दोघांवर पुणे ग्रामीण जिल्हयात भिगवण पोलीस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा करण्यात आलेला असून तपास स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण हे करीत आहेत.
तरी सदर आरोपींनी कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली असेल तर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पाषाण रोड, पुणे (फोन नं.020-25651353) येथे संपर्क साधावा.
बेरोजगार तरूणांनी सैन्यदलात व इतर सरकारी नोकरीस लावतो या अमिषाला बळी न पडता स्वतःची फसवणूक टाळावी…⭕
