• Home
  • चिंता वाढली! गेल्या २४ तासांत विक्रमी १४,५१६ नेवे रुग्ण ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

चिंता वाढली! गेल्या २४ तासांत विक्रमी १४,५१६ नेवे रुग्ण ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 चिंता वाढली! गेल्या २४ तासांत विक्रमी १४,५१६ नेवे रुग्ण 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

देशातील :⭕मागील 24 तासांत देशभरात करोनाचे तब्बल 14,516 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर, 375 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर देशभरातील करोनाबाधितांची संख्या आता सुमारे 3 लाख 95 हजार 048 वर पोहचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधितांपैकी 1 लाख 68 हजार 269 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 2 लाख 13 हजार 831 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत देशात करोनामुळे एकूण 12 हजार 948 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 53.79 टक्के आहे. दिलासादायक बाब म्हणजे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या बरे झालेल्या रुग्णांपेक्षा कमी आहे.
देशभरात 960 वैद्यकीय प्रयोगशाळा कार्यरत असून गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 76 हजार 959 नमुना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 7.67 टक्के नमुने करोनाबाधित आहेत. आत्तापर्यंत 64 लाख 26 हजार 627 नमुना चाचण्या झाल्या आहेत. प्रतिदिन 3 लाख नमुना चाचण्या करण्याची क्षमता आहे.

सलग तिसऱ्या दिवशी देशात रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद झाली असून गुरुवारी 12,881 रुग्ण आढळले होते तर शुक्रवारी 13,586 रुग्ण संख्या नोंदवली होती. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि गुजरात हे सर्वाधिक रुग्ण असलेली राज्य आहेत. कोरोना रुग्णांचा हॉट स्पॉट असलेल्या चेन्नई मध्ये काल (शुक्रवारी) पासून 12 दिवसांचा लॉक डाउन लागू करण्यात आला आहे.

‘कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत असताना नागरिक बेफिकीर होऊन बाहेर संचार करत आहेत, हे धक्कादायक आहे. ह्या रोगाने आता गंभीर रूप धारण केले असून फक्त घरात बसून कंटाळा येतोय म्हणून बाहेर पडणे धोक्याचे आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसुस यांनी सांगितले आहे…⭕

anews Banner

Leave A Comment