Home मुंबई देशावर संकट येताच बघा पळून चालले’, रातोरात न्यूयॉर्कला जाणारे शाहरुख खानचे कुटुंब...

देशावर संकट येताच बघा पळून चालले’, रातोरात न्यूयॉर्कला जाणारे शाहरुख खानचे कुटुंब नेटकऱ्यांकडून ट्रोल…! 🛑

105
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 देशावर संकट येताच बघा पळून चालले’, रातोरात न्यूयॉर्कला जाणारे शाहरुख खानचे कुटुंब नेटकऱ्यांकडून ट्रोल…! 🛑

मुंबई :⭕बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान आणि पत्नी गौरी खान यांना बुधवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर स्पॉट केले गेले.

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान आणि पत्नी गौरी खान यांना बुधवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर स्पॉट केले गेले. यावेळी हे दोघेही न्यूयॉर्कला रवाना होण्यासाठी विमानतळावर गेले होते. या दोघांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही लोक त्यांना कोरोनाची आठवण करून देत आहेत. तर काही लोक या कठीण काळात देश सोडून चालल्याबद्दल त्यांच्यावर टीका करत आहेत.

सोशल मीडियावर झाले ट्रोल
वास्तविक, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हल्ली न्यूयॉर्कमध्ये एकटीच राहत आहे. कोरोना काळात, भाऊ आर्यन खान आणि आई गौरी खान हे तिला भेटण्यासाठी निघाले आहेत.

अशा स्थितीत लोकांचा रोष या दोघांवर उमटला आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की, ‘हे सेलिब्रेटी फक्त नावाचे भारतीय आहेत, जेव्हा जेव्हा देशावर एखादी समस्या येते तेव्हा ते देशापासून दूर पळून जातात.’ त्याच वेळी, दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, ‘हो, जर भारताची परिस्थिती बिकट झाली, हे तर सर्व परदेशात पळून जातात, इथे पैसे मिळवा पण इथल्या लोकांना गरज पडल्यास बाहेर निघून जा.’

चाहत्यांनी केला प्रश्नांनाचा भडीमार त्याचबरोबर बरेच सामान्य लोक आणि चाहते प्रश्नांचा भडीमार करत विचारत आहेत की, ‘लॉकडाऊन फक्त सामान्य लोकांसाठी आहे का?, ही माणसे कशी जगभर फिरत आहेत’. त्याचवेळी एका व्यक्तीने लिहिले की, ‘कोणीतरी मालदीवला जात आहे, कोणी न्यूयॉर्कला जात आहे’.

त्याचवेळी एकाने लिहिले, ‘त्यांना भारताबाहेरच काढा.’⭕

Previous articleमयूर शेळके यांच्या धडाडीच्या कामगिरीबद्दल जावा कंपनीकडून देण्यात आले गीफ्ट..
Next articleउरळगाव येथे तात्काळ १२० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here