• Home
  • *जागतिक संवर्धन दिवसाच्या निमित्ताने प्राचिन मंदिराचे संवर्धन..*

*जागतिक संवर्धन दिवसाच्या निमित्ताने प्राचिन मंदिराचे संवर्धन..*

*जागतिक संवर्धन दिवसाच्या निमित्ताने प्राचिन मंदिराचे संवर्धन..* *लेखन- रोहित जाधव सटाणा*
बागलाण तालुका हा निसर्ग साधन संपत्तीने जसा नटलेला आहे. तसा ऐतिहासिक वारश्याने भरगच्च आहे. त्यात तालुक्याचे ठिकाण असलेल्या सटाण्या पासुन अवघ्या ८ किमी वर असलेले दोधेश्वर हे प्राचीन तीर्थक्षेत्र अवघ्या सटाणा वासियांचे आवडते धार्मिक पर्यटन क्षेत्र आहे. तसे दोधेश्वरास पांडव कालीन इतिहास आहे. अनेक मोठ मोठ्या राजवटींनी येथे भरमसाठ दाने दिली आहेत. अहिल्यादेवी होळकरांनी स्वत: येथे येवुन येथील दुग्धेश्वराची पुजा करुन तेथे बारव खोदण्यास सहाय्य केले व मंदिराच्या पुजाअर्चेसाठी कोटबेल या गावी कवठ व बेल यांची देवराई तयार करण्यासाठी जमिनी इनाम दिली अशी माहीती ऐतिहासिक कागदपत्रातुन मिळते. दोधेश्वर ह्या ठिकाणी ५ महादेव मंदिरे असुन त्या बाबतची कथा दिंडीमाकाव्यातुन अशी समजते की एका भल्या मोठ्या वारुळात झाडाचे मुळ सापडले. त्या मुळाजवळ शिवलिंग मिळाले. म्हणुन ते मुळेश्वर. मुळाला वेल मिळाला म्हणुन पुढे वेलेश्वर.काही अंतरावर वेलीला फुल आले म्हणुन फुलेश्वर. फुलातुन फळ आले म्हणुन फळेश्वर व फळातुन दुधासारखा पदार्थ आला म्हणुन दुग्धेश्वर. व त्याचाच अपभ्रंश होवुन पुढे दोधेश्वर हे नाव रुढ झाले. पद्मपुराणात सुध्दा दोधेश्वराचा उल्लेख मिळतो. अशा या प्राचीन ठिकाणी वेलेश्वर मंदिराची आज आम्ही जागतिक संवर्धन दिवसाचे औचित्य साधुन स्वच्छता मोहिम केली. सदर मंदिरावरील एका दगडावर शके 1502 असा अस्पष्ठ शिलालेख मिळतो या वरुन हे मंदिर बागलाण नरेश विरमशहा देव राठोड या बागुल राजांच्या काळात बांधले गेले असावे असा अंदाज मिळतो. तसा उल्लेख राष्ठ्रोढवंश महाकाव्यात सुध्दा येतो त्यामुळे तर्क बरोबर जुळतो. आजच्या मोहिमेवेळी मंदिरावर वाढलेले वडाचे झाड नागस्थंभ पध्दतीने काढुन ते पुन्हा मोकळ्या जागी लावले. जर ते झाड काढले नसते तर मंदिराची एका बाजुची भिंत झाडाच्या मुळ्यांनी कोसळली असती. व आपला प्राचीन वारसा नष्ट झाला असता. तसेच त्या भिंतीला पडलेले सर्व तडे सुध्दा पारंपारिकड पध्दतीने भरले ज्यात भेंडी,गुळ,बेलफळ, कापुर, रुई, साबर, व तुपाच्या एकत्रित मिश्रणाचा वापर केला होता. गर्भगृहातील शिवलिंग हे फिरते आहे. शिवलिंगा खाली सतत पाण्याचा झरा चालु असतो. काही खोडसाळ लोकांनी त्यात कचरा टाकला होता. ते सुध्दा स्वच्छ करुन घेतल्यामुळे पाणी वाढले मग साक्षात गंगेसारखे नितळ पाणी चालु झाले. मंदिरावर भगवा ध्वज लावल्यामुळे मंदिर परिसर प्रसन्न दिसत होता. लवकरच गडसेवकच्या माध्यमातुन तेथे पारंपारिक घटिकायंत्र व अक्षय प्रकाशाची व्यवस्था सुध्दा करणार आहोत. तसेच मंदिराच्या परिसरात बकुळ, चाफा, मोगरा, वड, पिंपळ, चिंच, बेल हे झाडे लावुन घेतले. आणि निस्वार्थी कार्याला दैवाची साथ लाभली व संपुर्ण कार्य पार पडल्यावर रिमझीम पाऊस पडुन गेला. जणु महादेवांनीच आशीर्वाद दिला. आजच्या मोहिमे वेळी गडसेवक फॉऊंडेशनचे रोहित जाधव, धिरज जाधव, वैभव पाटील तसेच मावळा प्रतिष्ठानचे युवराज पवार, रोहित आहेर, केतन सोनवणे व स्थानिक लहु जाधव, सचिन जाधव, श्रावण जाधव उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment