Home बुलढाणा बुलडाणा येथे विमानतळाची निर्मिती करावी …केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय नागरी...

बुलडाणा येथे विमानतळाची निर्मिती करावी …केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांच्याकडे केली आहे …

100

आशाताई बच्छाव

1000841907.jpg

बुलडाणा येथे विमानतळाची निर्मिती करावी …केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांच्याकडे केली आहे …
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा जिल्ह्याला ऐतिहासिक आणि पर्यटनाचा वारसा लाभलेला आहे या भौगोलिकस्थळांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून बुलडाणा येथे विमानतळाची निर्मिती करावी अशी आग्रही मागणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांच्याकडे केली आहे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवभारत निर्मितीचा कार्य सध्या सुरू आहे आज भारत हा जगाची तिसरी अर्थशक्ती म्हणून उदयास येत आहे देशांतर्गत रस्ते रेल्वे आणि हवाई वाहतुक या तिन्ही दळणवळणाच्या साधनांचा उपयोग नागरिकांना करता यावा या दृष्टिकोनातून देशपातळीवर काम सुरू आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जागतिक कीर्तीचे खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर आहे राष्ट्रमाता जिजाऊ यांची जन्मभूमी बुलढाणा जिल्ह्यात आहे शिवाय संत गजानन महाराज यांचं समाधीस्थळ असून आनंद सागर हे पर्यटक क्षेत्र आहे या धार्मिक अध्यात्मिक आणि पर्यटनस्थळाला भेटी देण्यासाठी देश विदेश आणि राज्यातील पर्यटक या ठिकाणाला भेटी देत असतात देश विदेशातील पर्यटकांच्यासाठी विमान सेवा ही जवळपास 125 किलोमीटर दूर आहे त्या ठिकाणी पोचण्यासाठी किमान चार तास लागतात पर्यटकांच्या आणि बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी नवीन विमानतळाची आवश्यकता आहे बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक धार्मिक आणि पर्यटक स्थळाचा विकस करण्याच्या दृष्टिकोनातून नवीन विमानतळाची निर्मिती बुलढाणा येथे करण्यात यावी अशी आग्रही मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे

Previous articleअवैध देशी विदेशी दारू विक्री बंद होईना ! – स्थानिक गुन्हे शाखा व लोणार पोलिसांची दारू विक्रेत्यावर धडक कारवाई !
Next articleमेरा खु येथे महावितरण कर्मचारी यांच्या नियोजन शुन्य कारभार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.