• Home
  • मुंबई- नाशिक महामार्गावरील थरार! धावत्या लक्झरी बसला अचानक आग ; प्रवाश्यांच्या बसमधून उड्या

मुंबई- नाशिक महामार्गावरील थरार! धावत्या लक्झरी बसला अचानक आग ; प्रवाश्यांच्या बसमधून उड्या

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210113-WA0034.jpg

मुंबई- नाशिक महामार्गावरील थरार! धावत्या लक्झरी बसला अचानक आग ; प्रवाश्यांच्या बसमधून उड्या
प्रतिनिधी= किरण अहिरराव

इगतपुरी शहर (नाशिक) : मुंबई- नाशिक महामार्गावर मंगळवारी थरारक दृश्य पाहायला मिळाले. धावत्या लक्झरी बसने अचानक पेट घेतला. अंगावर काटा आणणारे दृश्य पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मुंबई- नाशिक महामार्गावरील थरार! धावत्या लक्झरी बसला अचानक आग

मुंबई- नाशिक महामार्गावरील वाडीवऱ्हेच्या पुढे आठवा मैल शिवारात मंगळवारी (ता. १२) धावत्या लक्झरी बसमध्ये तांत्रिक शॉर्टसर्किट झाले. यामुळे लक्झरी बसने (यूपी ६५, ईटी ०१०१) पेट घेतला. ही बस मुंबईहून उत्तर प्रदेशकडे जात होती. दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. आगीत बस पूर्णपणे खाक झाली. सुदैवाने यात केवळ दोनच प्रवासी प्रवास करीत होते.
बसला मागच्या बाजूने आग लागताच चालकाने प्रसंगवधान राखत बस रस्त्याच्या बाजूला उभी करून बसमधून उड्या मारल्याने जीवितहानी टळली.

आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न

या घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण वाहतूक शाखा व वाडीवऱ्हे पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बघ्यांची गर्दी बाजूला केली. अग्निशमन दलाचा बंब बोलावून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीत बस पूर्णपणे खाक झाली.

anews Banner

Leave A Comment