• Home
  • वडगांवच्या प्रामाणिक रिक्षा चालकाचा अनाम प्रेम च्या वतीने रिक्षाश्री गौरव

वडगांवच्या प्रामाणिक रिक्षा चालकाचा अनाम प्रेम च्या वतीने रिक्षाश्री गौरव

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210113-WA0097.jpg

वडगांवच्या प्रामाणिक रिक्षा चालकाचा अनाम प्रेम च्या वतीने रिक्षाश्री गौरव

वडगांव : प्रतिनिधी वडगांव शहरातील रिक्षा चालक मनोहर कुंभार यांचा अनाम प्रेम परिवारांकडून गौरव करण्यात आला .
अनाम प्रेम चा हा उपक्रम गेली अकरा वर्षे मकर संक्रातीला मुंबई ,गोवा, अमरावती, कोल्हापूर , इचलकरंजी , पेठ वडगांव इत्यादी ठिकाणी सन्मान चिन्ह , सन्मानपत्र , व तिळगुळ देऊन सातत्याने राबवत आहेत दरवर्षी रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक अनाम प्रेम परिवार करीत आहेत, अनाम प्रेम हा परिवार कोणतीही संघटना किंवा रजिस्टर नसुन केवळ अनाम प्रेम हा एक परिवार आहे.
वडगांव शहरातील मनोहर श्रीपती कुंभार हे गेली तिस वर्षे रिक्षा व्यवसाय करीत आहेत
दररोज कित्येक प्रवासी रिक्षातुन प्रवास करीत असतात नकळत एखाद्या प्रवाश्याची वस्तू रिक्षामधे विसरली जाते ति वस्तू प्रामाणिकपणे परत करणारे वडगांव चे रिक्षावाले कुंभार मामा वाठार ते वडगांव रिक्षातुन प्रवास करणाऱ्या एका प्रवाश्याची बँग विसरली त्यावेळी मनोहर कुंभार यांनी मनात भलता सलता कसलाही विचार नकरता प्रामाणिकपणे त्या प्रवाश्याला कोणत्याही मोबदला न घेता बँग परत केली . त्यानंतर काही दिवसानंतर परत एकदा प्रमोद कुंभार यांना प्रामाणिक पणाची परिक्षा देण्याची वेळ आली ति म्हणजे एक महिला वडगांव ते वाठार कुंभार यांच्या रिक्षातुन प्रवास करित आसताना त्या महिलेची पर्स रिक्षात विसरली त्यावेळी देखील रिक्षावाले कुंभार मामा प्रामाणिकपणाच्या परिक्षेत शंभर गुणानी पास झाले , त्या महिलेची पर्स त्यांनी परत केली त्यामधे महत्त्वाचे कागदपत्र , पैसे, सोन्याची अंगठी अशा मौल्यवान वस्तू प्रामाणिकपणे परत करून
जे काम केले त्याच प्रामाणिकपणाचे कौतुक रिक्षाश्री असा गौरव अनाम प्रेम यांच्या वतीने स्नमानपत्र व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या सत्काराचे प्रमुख पाहुणे होली मदर इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष मा.श्री.सुजयसिंह राऊत व डाँ.सुरज कुडाळकर यांचे हस्ते मनोहर कुंभार(रिक्षाश्री )रिक्षा चालक यांचा गौरव वडगांव शहरातील बसस्थानक जवळील आदर्श रिक्षा स्टाँपवर करण्यात आला यावेळी. डाँ.सुरज कुडाळकर , सुजयसिंह राऊत (सर), संदिप वडेर सर ,अनाम प्रेमचे शिवाजी चौगुले ,संजय पोवार , अजय मोरे , ओंकार सांवत , सागर कांबळे ,आकाश पोवार , तसेच
रिक्षा युनीयन वडगांव शहर अध्यक्ष सरदार खाटीक
दिलीप सालपे , भरत सलगर ,मोहन पाटील , पोपट कुंभार , झाकीर चौगुले , सुनिल गोंजारे, प्रदिप सणगर , बापू पाटील , अक्षय कुंभार , लोकमत चे सुहास जाधव , तरूण भारत चे संतोष सणगर , जनप्रक्षोभचे संपादन प्रविण जाधव ,आण्णा कामत ,युवा मराठा संपादक मोहन शिंदे संतोष बामणे व सर्व रिक्षा चालक मालक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment