Home नांदेड ▪️ नाशिक मुक्त विद्यापीठ पदवी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क घेवून लोहा येथील...

▪️ नाशिक मुक्त विद्यापीठ पदवी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क घेवून लोहा येथील केंद्र संयोजक झाले भुर्र..

232
0

आशाताई बच्छाव

IMG-20230529-WA0077.jpg

▪️ नाशिक मुक्त विद्यापीठ पदवी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क घेवून लोहा येथील केंद्र संयोजक झाले भुर्र..
▪️ विद्यार्थ्यांनी घातला महाविद्यालय परिसरात गोंधळ तर महाविद्यालयीन प्रशासनाने केली पोलिसात तक्रार
अंबादास पाटिल पवार
लोहा, प्रतिनिधि
सरकारी नोकरी, खाजगी नोकरी करत तसेच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थांना मुक्त विद्यापीठाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांची पुढील स्वप्न साकार करता यावे म्हणून मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाकडे पहिले जाते. परंतु ज्यांच्याकडे सदर अभ्याससक्रमाची जबाबदारी आहे त्याच महाशयांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचे लाखो रुपये गोळा करून प्राध्यापक भुर्र.. झाले. दि. २९ रोजी अर्थशास्त्राचा पेपर असल्यामुळे विद्यार्थी परीक्षेचे प्रवेशपत्र घेण्यासाठी महाविद्यालयात जमा झाले. परंतु केंद्र संयोजकच गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. महाविद्यालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण करून संबंधित दोषी सहयोगी प्राध्यापक यांच्याविरुद्ध पोलिसात रीतसर तक्रार केली असल्याचे प्राचार्य डॉ. गवते यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत लोह्यातील श्री. संत गाडगे महाराज वरिष्ठ महाविद्यालयाकडे अभ्यासक्रम केंद्र असून त्याचे प्रमुख सहयोगी प्राध्यापक डॉ. अरुण भंडारे हे केंद्र संयोजक म्हणून मागील दहा वर्षांपासून काम पाहतात. सदर मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी अभ्यासक्रमासाठी जवळपास हजार विद्यार्थ्यांनी प्रा. भंडारे यांच्याकडे प्रवेश शुल्क तसेच पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा शुल्क (फीस) भरली असे उपस्थित विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र प्रा. भंडारे यांनी विद्यार्थ्यांकडून गोळा केलेली रक्कम गोळा करून ते फरार झाल्याची ओरड विद्यार्थ्यांकडून होत होती. प्रा. भंडारे यांनी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी २०६, द्वितीय वर्षासाठी ९ तर तृतीय वर्षासाठी १७ असे एकूण २३२ एवढ्याच विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क नाशिक विद्यापीठाकडे जमा केल्याने केवळ त्यांनाच यंदा परीक्षेस बसता येणार आहे. तर ज्यांनी परीक्षा फी प्रा. भंडारे यांच्याकडे जमा केली परंतु त्यांचे नाव २०२२-२३ मधील यादीत नाही अशा विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांची परीक्षा डिसेंबर / जानेवारी मध्ये घेण्यात येईल. असे महाविद्यालयीन प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जोपर्यंत आम्हाला परीक्षेचे प्रवेश पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही अशी भूमिका घेत ठिय्या दिला. तसेच यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. तणावाची परिस्थिती लक्षात घेता महाविद्यालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले होते. प्राचार्य डॉ. अशोक गवते, पोउपनि मारोती सोनकांबळे यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

▪️ मुक्त विद्यापीठ नाशिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश तसेच परीक्षा शुल्क संदर्भात विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेली तोंडी तक्रारीनुसार फी चा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. तसेच सदरील घटना नाशिक विद्यापीठाच्या समोर मांडण्यात आली असून भंडारे यांच्या गैरकारभाराची समिती नेमून चौकशी करण्यात येवून त्यांना निलंबित करण्यात येईल. आणि नियमानुसार परीक्षेपासून वंचित विद्यार्थांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये यासाठी प्रयत्न करणार आहे.
– प्राचार्य डॉ. अशोक गवते
श्री. सं. गा. म. महाविद्यालय लोहा

Previous articleपिक नुकसानीचे खोटे पंचनामे करणाऱ्या विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल…
Next articleसंपादकीय अग्रलेख… वेंदे साहेब,आपल्या राज्यात काय हे धंदे! बदनाम हुये तो क्या हुआ,काम तो हुआ!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here