Home संपादकीय संपादकीय अग्रलेख… वेंदे साहेब,आपल्या राज्यात काय हे धंदे! बदनाम हुये तो क्या...

संपादकीय अग्रलेख… वेंदे साहेब,आपल्या राज्यात काय हे धंदे! बदनाम हुये तो क्या हुआ,काम तो हुआ!

170
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230418-094434_Facebook.jpg

संपादकीय अग्रलेख… वेंदे साहेब,आपल्या राज्यात काय हे धंदे! बदनाम हुये तो क्या हुआ,काम तो हुआ! वाचकहो, आज आम्ही लिहिण्यास घेतलेला सडेतोड व निर्भिड अग्रलेख म्हणजे,प्रशासनाच्या अब्रुचे लक्तरे वेशीवर टांगणारा ठरणार आहे.समस्त स्त्री वर्गाचा अभिमान बाळगून स्त्रीला आदराची व सन्मानिची शिकवण देणारी आमची संस्कृती,कारण आमचाही जन्म एका स्त्रीच्या पोटीच झाला आहे हे आम्ही कधीच विसरत नाहीत.पण…आजच्या प्रस्तुत अग्रलेखातून आम्ही लिहित असलेली वस्तुनिष्ठ वस्तुस्थिती अशी आहे की,मालेगांवच्या व-हाणेतील पत्रकार भवन व पाणपोई जागेच्या प्रश्नावरुन गेल्या तीन वर्षापासून सुरु असलेले वादंग अजून शमलेले नाही.हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे.आणि या वादाची ठिणगी पेटविणारी ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे मँडम प्रशासनाच्या अनेक प्रकरणात दोषी आढळूनही प्रशासन मुग गिळून गप्प का? हा सवाल उपस्थित होतो.सुवर्णा सांळुखेची कारकिर्द तसं बघितले तर हाताणे,लेंडाणे,दहिवाळ आणि व-हाणे या सगळ्याच गावात वादग्रस्त ठरलेली आहे.व-हाणेतील पत्रकार भवन व पाणपोई जागेच्या प्रश्नावर प्रशासनाशी कागदोपत्री लेखनीयुध्द सुरु असतानाच,अनेकदा संघर्षात्मक पावित्रा घेऊन आंदोलनेही केलीत.मात्र मरगळलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना अद्याप घाम फुटलेला नाही.एकंदरीत सगळे एकाच माळेचे मणी या न्यायाने दोषी असलेल्या ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांना पाठीशी घालत “आपलेच दात आपलेच ओठ”या पध्दतीने लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारीतेची देखील विटंबना करुन टिंगलटवाळी करण्यात धन्यता मानत आहेत.पण…बोरुचा कचका व लेखनीचा धसका बडयाबडयांनी यापूर्वी “युवा मराठा”च्या लेखनीतून अनेकांनी घेतला आहे.याची जाण असावी एव्हढेच.पण.आम्हांला प्रकर्षाने एक शिकावयास मिळाले की,प्रशासनातील कागदी घोडे नाचवून “बदनाम हुये तो क्या हुआ,काम तो हुआ” या न्यायाने प्रशासनातले बडे अधिकारी दोषी व्यक्तीला, कामचुकार व कर्तव्यात (अ) प्रामाणिक असलेल्या ग्रामसेविकेला जेव्हा दोन -दोन गावे आंदण दिल्यासारखे बहाल करतात तेव्हा नक्कीच कुठे तरी काळेबेरे असल्याची शंका येते.आम्ही मालेगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.भरत वेंदे यांना कर्तव्यदक्ष व कर्तबगार अधिकारी समजतो.पण…या प्रकरणात त्यांनी लबाडाच्या हाती किल्ल्या देताना नको ते धंदे करु नयेत हिच प्रामाणिकपणे अपेक्षा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here